*अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद,नागपूर विभाग तर्फे बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी*
नागपुर उपजिल्हा प्रतिनिधि – दिलीप येवले
नागपुर:- आज दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ रोजी क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या १४६ व्या जयंती निमित्त अंबाझरी टेकडी नागपूर येथे केंद्र सरकारने घोषित केलेल्या “जनजाती गौरव दिवस” चा योग साधत बिरसा मुंडा यांची प्रेरणा आदिवासी युवकांना मिळावी यासाठी त्यांची क्रांती मशाल घेतलेली मूर्तीची प्रतिष्ठापना करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सर्वप्रथम गोंडी सप्तरंगी व पिवळा ध्वजाचे आरोहण व पूजन माजी उपमहापौर कृष्णराव परतेकी व भुमिता वरठी यांच्या हस्ते करण्यात आले.मान्यवरांचे स्वागत विजय परतेकी यांनी केले.प्रास्ताविक राहुल मडावी यांनी केले.या प्रसंगी बोलताना सिनेट सदस्य दिनेश शेराम म्हणाले की, बिरसा मुंडा यांनी तरुण वयात जल,जंगल आणि जमीन यांच्या संरक्षणासाठी व अन्याय, अत्याचार,शोषण या विरूद्ध ब्रिटिश व सावकार यांचे विरूद्ध संघटितपणे “उलगुलान” चा नारा देत संघर्ष पुकारला,आज आपली पिढी शिक्षित होऊन संविधानिक मार्गाने आपले हक्क मिळवण्यासाठी एकत्रित येणे गरजेचे आहे.परिषदेचे महासचिव विनोद मसराम म्हणाले की,कोणत्याही राजकीय व्यक्तीची मदत न घेता समाजातील लोकांनी आपल्या आर्थिक योगदान यामधून पुतळा उभारला व आपला स्वाभिमानी बाना जोपासला या बद्दल समाजाचे अभिनंदन.आदिवासी समाजाचे मूर्तिकार प्रवीण कुळमेथे यांचा सत्कार करून पेढे वाटून,गोंडी वाद्य यावर नृत्य करून आनंद साजरा करण्यात आला.आभार मंगला कोडापे यांनी व्यक्त केले.या प्रसंगी संतोष आत्राम,अरविंद गेडाम,रवी कोटणाके,सचिन आत्राम,मयुर मलगाम,आशिष सोयाम,ओम येटे,सुरेंद्र नैताम, अमन बोरे,नयन गेडाम, गणेश वालवांशी,रोशन यादव,प्रमोद उईके,आकाश परतेकी, पूर्वेश बोरकर,प्रफुल पेंदाम,ललिता नेवारे,रेखा मलगाम,आशा उईके,प्रतिभा पालकर,शोभा सलामे,शकुन केराम,कविता भलावी, छाया जुमनाके,रुक्मिणी आत्राम,कविता इवणाते, तारा मडावी, जानवी कार्लेकर,कोमल नेवारे,रितिका पारकर,निकिता कोडापे,शिवानी पंधराम, प्रियंका भलावी,कोमल मडावी,शिवानी मडावी, दिव्या पारकर,अनिता उईके,सरोज ताई,दीप्ती ताई,अमित आहाके,यशवंत मसराम,कृष्णा सलामे,आशिष मसराम,सौरभ तुमडाम,सुशील उईके,निकेश परतेकी,संकेत मडावी,शुभम परतिके,सचिन उईके,ज्ञानेश्वर मडावी,आकाश परतेकी आदी उपस्थित होते.