*महाराष्ट्र कामगार कल्याण केन्द्र खापरखेडा येथे कोविड-१९ आजाराबद्दल मार्गदर्शन शिबीर कार्यक्रम संपन्न*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधि दिलीप येवले
खापरखेडा :- महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट क्रमांक २ अन्तर्गत कामगार कल्याण केन्द्र खापरखेडा येथे नंदलाल राठोड (सहायक कल्याण आयुक्त) व प्रतिभा भाकरे ( कामगार कल्याण अधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १६/११/२०२१ रोजी कोविड-१९ आजाराबद्दल मार्गदर्शन शिबीर कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

सर्व प्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष पुरूषोत्तम मानकर ( गुणवंत कामगार पुरस्कृत) कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दिलीप येवले (सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार), डॉ. आय. एम. खान सर्व मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. सर्व मान्यवरांचे वृक्ष देऊन स्वागत करण्यात आले. सर्व मान्यवरांनी आप आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. आय. एम. खान यांनी उपस्थितांना कोविड-१९ आजाराबद्दल अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. मास्क, सॅनिटाइजरचा वापर आणि हात नेहमी स्वच्छ धुवावेत. असे त्यांनी आपल्या व्याख्यानातून व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शालु टेकाडे ( केन्द्र महिला कल्याण सहाय्यिका) यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदा सोनुरकर, सुनील ऊके, आशिष भालेराव, पुनम सय्यामे, वैशाली अन्ड्स्कर, शकुंतला ठवरे, संगणक वर्गातील विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले.
Maharashtra News Media सच की आवाज