*दुःखद बातमी*
*विदर्भाची धधगती मशाल शमली*
*विदर्भवादी नेते राम नेवले यांचे दुखःद निधन*
नागपुर – शेतकरी संगठनेचे महाराष्ट्र माजी प्रांताध्यक्ष ,जय विदर्भ पार्टीचे संस्थापक अध्यक्ष व विदर्भ राज्य आंदोलन समिती चे मुख्य संयोजक *राम नेवले यांचे आज दि:16/11/2021 ला मध्यरात्री 1 वाजता अचानक हृदयगती थांबल्याने दुःखद निधन झाले*
*त्यांच्या पार्थिवावर 17/11/2021, बुधवारी सकाळी 11 वाजता मानेवाडा घाट, नागपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.*
*राम नेवले यांच्या आकस्मिक निधनाने “वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनाला मोठा हादरा बसला असुन सकाळी त्यांच्या निधनाची बातमी कळताच विदर्भवादी एकदम स्तब्ध झाले असुन सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे*

*विदर्भवादी नेते राम नेवले यांना महाराष्ट्र न्युज मीडियाच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली व त्यांच्या कुटूंबीयांना या दुखाःतून सावरण्याची ईश्वर शक्ती प्रदान करो हीच सदिच्छा*
Maharashtra News Media सच की आवाज