*कन्हान येथे स्वर्ग श्री बाबासाहेब पुरंदरे यांना दिली श्रद्धांजलि*
*कन्हान शहर विकास मंच द्वारे श्रद्धांजलि कार्यक्रमाचे आयोजन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधना नंतर संपुर्ण देशात शोक चे वातावरण निर्माण झाल्याने कन्हान गांधी चौक येथे कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी स्वर्ग श्री बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व पुष्प अर्पित करुन तसेच दोन मिनटाचा मौन धारण करुन बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजलि देण्यात आली .
मराठी साहित्यकार , नाटककार , लेखाकार , इतिहासकार , शिवशाहीर स्वर्ग श्री बाबासाहेब पुरंदरे हे आॅक्टोंबर महिन्याचा शेवटी तोल जाऊन घरात पडल्याने त्यांच्या डोक्यावर मार लागला होता . त्यांना पंधरा ते वीस दिवसान पुर्वी पुण्याचा दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात भर्ती करण्यात आले होते . त्यातच त्यांना निमोनिया झाल्याने त्यांची प्रकृती जास्त खराब झाल्याने उपचारा दरम्यान सोमवार दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ ला सकाळी ५:०० वाजता च्या सुमारास त्यांचे निधन झाले . ते ९९ वर्षाचे होते .शिवशाहीर स्वर्ग श्री बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधना नंतर संपुर्ण देशात शोक चे वातावरण निर्माण झाल्याने कन्हान गांधी चौक येथे कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी मंच संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये स्वर्ग श्री बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन , व दीप प्रज्वलन करुन श्रद्धांजलि कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित सर्व मंच पदाधिकार्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन तसेच दोन मिनटाचा मौन धारण करुन बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रद्धांजलि देण्यात आली .
या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच चे संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर , महेश शेंडे , हरिओम प्रकाश नारायण , भरत सावळे , हर्ष पाटील , महादेव लिल्हारे , शुभम मंदुरकर , चंदन मेश्राम , महेंद्र साबरे , सुरज वरखडे , प्रकाश कुर्वे , शाहरुख खान , किरण ठाकुर , अक्षय फुले सह आदि मंच पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते . कार्यक्रमाचे सुत्र संचालन मंच संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर यांनी केले .
Maharashtra News Media सच की आवाज