*कन्हान येथे बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथि साजरी* *शिवसेना कन्हान शहर द्वारे कार्यक्रमाचे आयोजन*

*कन्हान येथे बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथि साजरी*

 

*शिवसेना कन्हान शहर द्वारे कार्यक्रमाचे आयोजन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – शिवसेना कन्हान शहर द्वारे हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय स्वर्ग.श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्य कार्यक्रमाचे आयोजन शिवाजी महाराज स्मारक शिवाजी नगर येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात उपस्थित नप नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथि साजरी करण्यात आली .

बुधवार दिनांक १७ नोव्हेंबर २०२१ ला हिंदूहृदयसम्राट शिवसेनापक्षप्रमुख वंदनीय स्वर्ग.श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्य शिवसेना कन्हान शहर द्वारे कार्यक्रमाचे आयोजन शिवाजी महाराज स्मारक शिवाजी नगर येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित कन्हान – पिपरी नगरपरिषद नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली . या प्रसंगी कार्यक्रमात उपस्थित शिवसेना उपजिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले , नगरसेवक अनिल ठाकरे सह आदि शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर उपस्थितांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित सर्व शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथि साजरी करण्यात आली .

या प्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले , शिवसेना महिला उपजिल्हा प्रमुख शुभांगी घोगले , कन्हान – पिपरी नगराध्यक्षा करुणा आष्टणकर , उपाध्यक्ष डायनल शेंडे , शिवसेना तालुका प्रमुख राजू भोस्कर , नगरसेवक अनिल ठाकरे, नगरसेविका मोनिका पौनिकर, शिवसेना कन्हान शहर प्रमुख छोटु राणे, शिवसेना महिला शहर प्रमुख मनीषा चिखले, भारत पगारे, चिंटू वाकुडकर, प्रदीप गायकवाड, अजय चव्हाण, हरीश तिकडे, समशेर पुरवले, सोनू खान, शुभम येलमुले, वैशाली श्रीखंडे, लता लुंढुरे, लीना हारोडे सह आदि शिवसैनिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …