*भटक्या विमुक्तांना स्वातंत्र्याची पहाट पहायला किती वेळ लागेल ?*

*संघर्ष वाहिनी तर्फे जनजागृती रॅलीत प्रश्न*
*कन्हान येथे रैलीचे भव्य स्वागत*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा होत असतांना सुद्धा भटक्या विमुक्तांची स्वातंत्र्याची पहाट अद्याप उगवली नाही. संविधान लागु झाले असतांना सुद्धा संविधानापासून वंचित राहावे लागत असल्याने आपल्या मुलभूत हक्कासाठी भटक्या विमुक्तांनी एक जुटीने लढा द्यावा, असे आवाहन संघर्ष वाहिनी तर्फे जनजागृती रॅलीत दिनानाथ वाघमारे यांनी केले.
भटक्या विमुक्तांच्या विविध विषयांवर, प्रश्नांवर जनजागृती करण्यासाठी विदर्भात १८ ते २७ नोव्हेंबर पर्यंत जनजागृती रॅली आयोजित करण्यात आले आहे. या रॅलीचे आंबेडकर चौक कन्हान येथे माजी नप उपाध्यक्ष डॉ मनोहर पाठक व खिमेश बढिये यांच्या नेतृत्वात स्वागत करण्यात आले. या रॅलीत सहभागी दिनानाथ वाघमारे, मुकुंद अडेवार, राजेंद्र बढिये, उमेश कोराम, धिरज भिसीकर, पर्बत रब्बानी, विनोद आकुलवार, संजय भुरे या शिलेदारांचा सत्कार करून रॅलीला शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नप उपाध्यक्ष डॉ मनोहर पाठक यांनी करून शासनाकडून भटक्या विमुक्तांच्या शासनस्त रावरून योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची खंत व्यक्त केली. भटक्या विमुक्त चळवळीतील अभ्यासु कार्यकर्त्यांनी समाजाला पुढे आणण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करीत भटक्या विमुक्तांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्व घटकांनी सहकार्य करावे असे सुध्दा आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन खिमेश बढिये यांनी तर आभार प्रदर्शन सुतेश मारबते यांनी मानले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष डॉ मनोहर पाठक, सुतेश मारबते, खिमेश बढिये, भालचंद्र बोंद्रे, मोहन भोयर, शालिक बावने, शिक्षक नेते व भट क्या विमुक्तांचे अभ्यासक मिलिंद वानखेडे, भिमराव शिंदेमेश्राम, माजी उपनगराध्यक्ष व नगरसेवक योगेश (बाबु) रंगारी, माजी जि प उपाध्यक्ष शरद डोणेकर, नारायण गजभिये, कामेश्वर शर्मा, दिवाळू मेश्राम, सुनिल लाडेकर, रूपेश मेश्राम, पंचम सलामे, शेषराव बावने, संजय रंगारी, अमन घोडेस्वार, सचिन वासनिक, समर्यता देशभ्रतार, माधव वैद्य, दिनेश इनवाते, ऋृषभ बावनकर, सौ.स्वाती पाठक, सौ.तुलेशा नानवटकर, अमोल साकोरे, दिनेश नानवटकर, विलास डाखोळे , रिता बर्वे, नगरसेविका सौ.वंदना कुरडकर, सौ.वर्षा लोंढे, सौ.संगीता खोब्रागडे, रेखा टोहणे, नगरसेवक राजेंद्र शेंदरे, मनिष भिवगडे, मनोज कुरडकर, अजय लोंढे, राजेंद्र खंडाईत, माधव काटोके, अमोल प्रसाद, प्रशांत मसार, प्रदीप बावने, गणेश खोब्रागडे, प्रेमचंद राठोड, शरद वाटकर, सतीश भसारकर, चंदन मेश्राम यांच्यासह भटक्या विमुक्त व ओबीसी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येनत उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज