*परमात्मा एक सेवक च्या वनभोजन कार्यक्रमात तुषार सुर्यवंशीच्या प्रबोधनाने सेवक मंत्रमुग्ध*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – भगवत कृपा परम पुज्य परमात्मा एक सेवक संस्था कांद्री च्या वतीने मानव मंदिर कांद्री येथे वनभोजन कार्यक्रमा निमित्य सप्त खंजेरी वादक किर्तनकार तुषार सुर्यवंशी यांच्या प्रबोधनाने उपस्थित सेवक, सेविका मंत्रमुग्ध झाले.
कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष (मार्गदर्शक) राम भाऊ सावरकर, नागपुर जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. रश्मीताई बर्वे, ग्राम पंचायत कांद्री सरपंच बलवंत पडो ळे, उपसरपंच श्यामकुमार बर्वे, माजी जि प सदस्य योगेश वाडीभस्मे आदी मान्यवराच्या प्रमुख उपस्थित परम पुज्य परमात्मा एक सेवक संस्था कांद्री व्दारे आयोजित वनभोजन कार्यक्रमाची सप्त खंजेरी वादक किर्तनकार तुषार सुर्यवंशी यांच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाने सुरूवात करण्यात आली. यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज हयानी ग्राम समृ ध्दीकरिता केलेल्या कार्यासह मानवधर्माचे उपासक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे सुध्दा व्यसन मुक्त समाज निर्मिती करिता मौलिक कार्याने बहुतेक कुंटुबे सुखी संसाराकडे वाटचाल करित असल्याचे मनोरंज नात्मक गिताच्या प्रबोधनाने उपस्थित सेवक, सेविका मंत्रमुग्ध झाले. तदंनतर वनभोजन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता हरिषचंद्र नाटकर, दौलतजी बर्वे, वसंतराव लोहकरे, रामजी बावने, अरूण पोटभरे, धनराज ढोबळे, सितारा म नाटकर, अशोक कुंभलकर, गेंदलाल भोपचे, गोपाल कुंभलकर, प्रशांत देशमुख, मनोहर सरोदे, गजानन आकरे, राहुल देशमुख, अमोल कापसे, रेखाबाई सावर कर, रेखाबाई शिंगणे, ईंदुबाई ढोबळे, कश्यपबाई सह सर्व सेवक, सेविका आणि ग्रामस्थानी सहकार्य केले.
Maharashtra News Media सच की आवाज