*उमंग गीताई कॉलेज तर्फे बालक दिवसाचे आयोजन*
नागपुर उपजिल्हा प्रतिनिधि – दिलीप येवले
कोराडी:- उमंग कला निकेतन एज्युकेशन सोसायटी, नागपूर अंतर्गत येणाऱ्या उमंग गीताई कॉलेज ऑफ वूमेन्स एज्युकेशन, नागपूर च्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग अंतर्गत बालक दिनानिमित्त तेजस्विनी विद्यालय, कोराडी, नागपूर येथे दि. १५ नोव्हे. २०२१ रोजी बालक दिनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी तेजस्विनी विद्यालयाचे प्राचार्य रेवतकर सर, प्रा. डॉ. रोशनखेडे मॅडम व प्रा. भोंगाडे सर मंचावर उपस्थित होते. उमंग महाविद्यालयातर्फे प्राचार्य डॉ. अतुल टेकाडे, प्रा. हुस्ना झाकी आणि रासेयो प्रमुख प्रा. तृप्ती डोंगरे व रासेयो विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला तेजस्विनी विद्यालयाचे प्राचार्य प्रा. रेवतकर सर यांनी माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. याप्रसंगी प्रा. डॉ. अतुल टेकाडे यांनी बालक दिनाचे महत्व पटवून दिले व सहभागी विद्यार्थी-विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या. उमंग महाविद्यालयाच्या प्रा. हुस्ना झकी यांनी विद्यार्थी जीवन व बाल्यावस्थेत न्यूट्रिशन चे महत्व यावर आपले विचार मांडले. तेजस्विनी महाविद्यालयातर्फे प्राचार्य रेवतकर सर व प्रा. डॉ. रोशनखेडे मॅडम यांनी विद्यार्थिनींना प्रोत्साहनपर भाषणे दिले. कार्यक्रमादरम्यान महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी कु. झुबीया गाझी, कु. आरती सोनटक्के, कु. हर्षदा गजभिये, कु. सायमा शेख व कु अदिती सोनटक्के यांनी आपली भाषणे दिली. ह्यानंतर उमंग महाविद्यालयातर्फे उपस्थित विद्यार्थ्यांकरिता फळे, चॉकलेट, बिस्कीट इ. चे वाटप करण्यात आले. कार्यक्रमानंतर उमंग महाविद्यालय तर्फे तेजस्विनी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकरिता वेग वेगळे मैदानी खेळांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. तृप्ती डोंगरे ह्यांनी तर आभार प्रदर्शन कु. मानसी मोतीकर हिने केले. सर्वात शेवटी उमंग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अतुल टेकाडे यांनी तेजस्विनी महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे व शिक्षकवृंदाचे आभार मानले.