Breaking News

*मोठी बातमी* *नागपुर – जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गावर कोळसाच्या ट्रकची दुचाकीला धडक, भिषण अपघातात मुलीचा मृत्यु* *फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला कोळसाच्या ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल*

*मोठी बातमी*

*नागपुर – जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गावर कोळसाच्या ट्रकची दुचाकीला धडक, भिषण अपघातात मुलीचा मृत्यु*

*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला कोळसाच्या ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत एम एच के एस पेट्रोल पंप जवळ कोळसाच्या बारा चाकी ट्रकने दुचाकी वाहनाला मागुन जोरदार धडक मारल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवर मागे सवार एका मुलीचा मृत्यु झाल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरुन आरोपी बारा चाकी ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे .


पोलीस सुत्रान कडुन प्राप्त झालेल्या माहिती नुसार रविवार दिनांक.२१ नोव्हेंबर ला सकाळी ११:३० ते ११:४५ वाजता च्या दरम्यान गणपत मोतीराम वंजारी वय ३० वर्ष राहणार.शिवनगर कन्हान हा आपल्या दुचाकी वाहन क्रमांक. एम एच ४० ए एच १८५२ हिरो डिलक्स ने मृतक भासी कुमारी करीना राजाराम भुते वय १८ वर्ष राहणार. साटक हिला कन्हान येथुन तिच्या घरी साटक ला नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गाने नेऊन देत असतांना एम एचकेएस पेट्रोल पंप वराडा जवळ कोळसाच्या बारा चाकी ट्रक क्रमांक. एम एच ४० सी डी ३४६१ च्या चालका ने आपले वाहन निष्काळजीपणाने व वेगाने चालवुन दुचाकी वाहनाला मागुन धडक मारल्याने झालेल्या अपघातात मागे सवार भासी कुमारी करिना भुते खाली पडुन डोक्याला मार लागल्याने तिला उपचारा करिता कामठी रुग्णालय येथे नेले असता डाॅक्टरांनी मृत घोषित केले.

तसेच फिर्यादी गणपत वंजारी ला अपघातात किरकोळ मार लागल्याने त्यास उपचाराकरिता कामठी रुग्णालयात भर्ती केले असुन उपचार सुरू आहे. या घटनेची माहिती कन्हान पोलीसांना मिळताच महामार्ग पोलीस व कन्हान पोलीस स्टेशन चे एपीआई सतिश मेश्राम सह पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचुन पंचनामा करून कोळसाच्या बारा चाकी ट्रक व दुचाकी वाहन ताब्यात घेतले . सदर प्रकरणी कन्हान पोलीसांनी फिर्यादी गणपत मोतीराम वंजारी यांच्या तक्रारीवरून ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे च्या मार्गदर्शनात एपीआई सतिश मेश्राम सह आदि पोलीस कर्मचारी करीत आहे.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …