Breaking News

*कन्हान येथे ११४ आदिवासी गोवारी शहिदांना दिली श्रद्धांजली* *आदीवासी गोवारी समाज संघटन कन्हान व्दारे श्रध्दांजली कार्यक्रमाचे आयोजन*

*कन्हान येथे ११४ आदिवासी गोवारी शहिदांना दिली श्रद्धांजली*

*आदीवासी गोवारी समाज संघटन कन्हान व्दारे श्रध्दांजली कार्यक्रमाचे आयोजन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – आदीवासी गोवारी समाज संघटन कन्हान द्वारे आदिवासी गोवारी शहिदांना श्रद्धांजलि कार्यक्रमाचे आयोजन गोवारी शहिद चौक तारसा रोड कन्हान येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मान्यवरांचा हस्ते शहिद स्मारकावर पुष्प हार माल्यार्पण करुन व पुष्प अर्पित करुन तसेच दोन मिनटाचा मौन धारण करुन समाजाच्या न्यायीक मागणी करिता नागपुर हिवाळी अधिवेशनात चेंगराचेगरीत शहिद झालेल्या ११४ आदिवासी गोवारी शहिद बांधवांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

नागपुर येथे हिवाळी अधिवेशन सुरु असतांना २३ नोव्हेंबर १९९४ रोजी गोवारी समाजाला आदिवासी दर्जा देऊन १९८५ साली सरकारने काढलेला आदेश रद्द करण्याचा मागणी करिता गोवारी समाज बांधवांनी विधान भवनावर काढलेल्या मोर्चात पोलीसांच्या लाठीचार्ज मुळे झालेल्या चेंगराचेंगरीत आदिवासी गोवारी समाजाचे ११४ बांधव शहिद झाले होते. यात कांद्री कन्हान चे ताराचंदजी भोंडे व कामठी ची कु. करूणा नेवारे ही सुध्दा शहिद झाले होते. त्याच्या स्मृती प्रित्यर्थ मंगळवार दिनांक.२३ नोव्हेंबर २०२१ रोजी नागपुर हिवाळी अधिवेशनात झालेल्या घटनेला २७ वर्ष पुर्ण झाल्याने आदिवासी गोवारी समाज संघटन कन्हान व्दारे आदिवासी गोवारी शहिद चौक तारसा रोड कन्हान येथे समाजाचे जेष्ट नागरिक श्री नारायणराव कावरे यांच्या अध्यक्षेतेखाली व प्रमुख अतिथी अखिल भारतीय आदिवासी गोवारी संघ नागपुर जिल्हाध्यक्ष भगवान भोंडे, तालुकाध्यक्ष नेवालालजी सहारे, गोंडवाना गणतंत्र पार्टी चे सुख लाल मडावी, नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर, नगर सेवक योगेंद्र रंगारी, राजेंद्र शेंदरे, राजेश यादव सह आदिं च्या हस्ते शहिद ताराचंदजी भोंडे, शहिद करूणाताई नेवारे यांच्या प्रतिमेला व आदिवासी गोवारी शहिद स्मारकावर पुष्पहार माल्यार्पण करुन , पुष्प अर्पित करुन , दीप प्रज्वलित करून तसेच दोन मिनटाचे मौनधारण कर भावपुर्ण श्रध्दजंली अर्पण करण्यात आली.

यावेळी मा.भागवान भोंडे, नेवालालजी सहारे, गोगपाचे सुखलाल मडावी, नगराध्यक्षा करूणा ताई आष्टणकर आदीं नी समाजाचे हक्क, एकत्रिकरणा विषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी कन्हान-पिपरी नगरपरिषद नगरसेवक अनिल ठाकरे, नगरसेविका रेखा टोहणे, गुंफा तिडके, सुषमा चोपकर, पत्रकार कमलसिंह यादव, ऋृषभ बावनकर, भरत सावळे, शिव शंकर (चिंटु) वाकुडकर, छोटु राणे , अशोक पाटील, नरेश सोनेकर, हरिष तिडके , सोनु मसराम , सह आदि गोवारी बांधव प्रामुख्या ने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आनंद सहारे यांनी केले तर आभार अनिल ठाकरे यांनी व्यक्त केले.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …