कोरपना,गडचांदूर,बिबी येथे “ह.म.पैगंबर” जयंती उत्साहात साजरी.
शहरात भव्य रॅली/हिन्दु,मुस्लिम एकतेचे दर्शन.
आवारपूर प्रतिनिधि- गौतम धोटे
मुस्लिम समाजाचे श्रद्धास्थान, मुस्लिम धर्मगुरू” पैगंबर हज़रत मोहम्मद” (स.अ.स.)जयंती(जश्ने ईद मिलादुन्नबी) कोरपना,गडचांदूर,बिबी येथे मोठ्या हर्षोल्हास व उत्साहाने साजरी करण्यात आली.यानिमित्ताने शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले.नात वाचन,धार्मीक कव्वाली सादर करत रॅली शहरातील मुख्य मार्गाने भ्रमण करीत मशीदीत पोहोचली.इमामांच्या मार्गदर्शनाखाली विशेष प्रार्थना करण्यात आली.पैगंबर यांचा जन्मोत्सव,इस्लाम धर्मगुरूंचे आचरण आणि त्यांनी दिलेली शिकवण आत्मसात करुन व दिलेला संदेश अमलात आणला तर कधीच इस्लामिक व्यक्ती चुकीच्या मार्गाने जाणार नसल्याचे अमुल्य मार्गदर्शन उपस्थितांना करण्यात आले.रॅलीमध्ये परिसरातील मुस्लिम बांधव मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते.यावेळी चिमुकल्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता.हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना प्रत्यक्ष,अप्रत्यक्ष विविध माध्यमातून या पवित्र ईदच्या शुभेच्छा दिल्या.रॅली दरम्यान सर्वत्र धार्मिक एकतेचे दर्शन घडत होते.९ नोव्हेंबर रोजी मा.सर्वोच्च न्यायल्याने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत असून १३५ वर्षापासून सुरू असलेल्या वादाला एका क्षणात पुर्णविराम मिळाला. देशात एक नवीन पर्वाची सुरुवात व सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण होईल अशी भावना समाजसेवक सैय्यद आबीद अली सह इतरांनी News34 च्या माध्यमातून व्यक्त केली. रॅली दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागिय पोलिस अधिकारी विलास यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली कोरपना व गडचांदूर येथील ठाणेदारांनी पोलिस बंदोबस्त अगदी चोख ठेवल्याचे पाहायला मिळाले.एकुणच हा पवित्र सण अत्यंत शांततापूर्ण,उत्साह व हर्षोल्हासाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.