Breaking News

*जेष्ठ नागरीक मडंळ काटोल द्वारा मातोश्री वृध्दाश्रमास कापड वाटप व जेष्ठांची सहल*

*जेष्ठ नागरीक मडंळ काटोल द्वारा मातोश्री वृध्दाश्रमास कापड वाटप व जेष्ठांची सहल*

सावनेर – कोविड-19 च्या विषाणू चा प्रादूर्भाव कमी झाल्याने जेष्ठ नागरीक मंडळ काटोल द्वारा कोविड-19 सबंधाने शासन आदेशाचे पालन करून जेष्ठाकरिता विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने सामाजिक बांधिलकी ची कास बाळगून दिनांक 25.11.2021 ला गुरूपुष्यामृत शुभदिनी 35 जेष्ठांना सोबत घेऊन सहलीचे आयोजन केले.
मातोश्री वृध्दाश्रम आदासा येथील निवासी वृध्दांकरिता मडंळाचे अध्यक्ष श्री रमेश तिजारे, सचिव श्री गजाननराव भोयर, माजी अध्यक्ष श्री विनायकराव राऊत व श्रीमती दुर्गाताई कडू यांचे सहकार्याने 16 नविन साड्या, 66 पायमोजे व 13 शर्ट वृध्दाश्रमात देण्यात आलेत.काही वृध्दांशी संवाद साधला असता त्यांचे चेहर्यावर समाधानाचे व कृतज्ञतेचे भाव दिसत होते.


वृध्दाश्रमाचे व्यवस्थापक श्री प्रदीप चंदनबटवे यांनी तेथील एकाही वृध्दांस कोविड-19 च्या विषाणू ची लागण झाली नसल्याचे सांगितले.
विदर्भाचे पंढरपूर श्रीक्षेत्र धापेवाडा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर, आदासा येथील आद्यदैवत श्री गणेशजी चे दर्शन घेऊन सर्वांनी सामुहिक भोजणाचा आस्वाद घेतला.
त्यानतंर कोराडी येथील श्री जगदंबा मातेचे दर्शन, वाकी येथील हजरत ताजुद्दीनबाबा दरगाह चे दर्शन घेतले. परतीच्या प्रवासात श्री ताज आनंदाश्रम सावंगी(सावनेर) येथे जाऊन श्री भय्याजी महाराज समाधीचे दर्शन घेतले.

याप्रसंगी प्रामुख्याने मंडळाचे अध्यक्ष श्री रमेशराव तिजारे ,उपाध्यक्ष श्री शामरावजी झामडे, सचिव श्री गजाननराव भोयर, सहसचिव श्री अरुण पुंड, कोषाध्यक्ष श्री रूपराव राऊत, संचालक श्री मोतीराम वंजारी, व सर्वश्री विनायकराव राऊत, नत्थुजी भाजीखाये, मनोहर टेंभेकर, शंकरराव बोरडे, एकनाथ कळसकर, हनुमंतराव कुहीटे, वसंतराव जीचकार , केशवराव दिग्रसे, ज्ञानेश्वर बोढाळे ,श्रीमती निर्मलाताई कोंडे, व दुर्गाताई कडू यांचेसह एकुण 35 जेष्ठ नागरीकांनी सहलीचा आनंद घेतला. कार्यक्रमाचे सुदंर नियोजन झाल्याने प्रवास आनंदी व सुखकर झाल्याबद्दल सहकार्यानी समाधान व्यक्त केले.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …