Breaking News

*कन्हान येथील इसमाची गळफास लावुन केली आत्महत्या.* *फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला मर्ग चा गुन्हा दाखल*

*कन्हान येथील इसमाची गळफास लावुन केली आत्महत्या.*

*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला मर्ग चा गुन्हा दाखल*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत नगरपरिषद श्रेत्रात हनुमान नगर कन्हान येथील नरेश सावरकर या इसमा ने अज्ञात कारणावरून कंटाळुन घरातील छताच्या हुकाला दोरीच्या साहयाने गळफास लावुन आत्महत्या केली.


रविवार दिनांक.२१ नोव्हंबर ला सकाळी ६.३० वाजता दरम्यान हनुमान नगर कन्हान येथील नरेश गोपीचंद सावरकर वय ४४ वर्ष यांनी अज्ञात कारणाने आपल्या घरातील छताच्या हुकला दोरीच्या साहयाने गळफास लावुन आत्महत्या केल्याने फिर्यादी वडिल श्री गोपीचंद सावजी सावरकर वय ७१ वर्ष राहणार. हनुमान नगर कन्हान यांच्या तक्रारीवरून कन्हान पोलीसांनी करून कलम १७४ अन्वये मर्ग दाखल करण्यात आला. सदर प्रकरणा बाबत कन्हान पोलीस स्टेशन चे निरिक्षक विलास काळे यांचे मार्गदर्शनात शिपाई मंगेश ढबाले यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरीता उपजिल्हा रूग्णालय कामठी ला पाठवुन पोलीस उपनरिक्षक जावेद शेख, शिपाई मंगेश ढबाले सह आदि सिपाई पुढील तपास करित आहे.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …