*राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक भारतीय संविधान – डॉ.शरयू तायवाडे*
नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले
कोराडी:- तायवाडे महाविद्यालय महादुला- कोरडी जि. नागपुर अंतर्गत *राष्ट्रीय सेवा योजना युनिट*व राज्यशास्त्र विभाग द्वारा *संविधान दिवस* चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाप्रसंगी तायवाडे महाविद्यालय ,महादुला-कोराडी येथील राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.वकील टी.शेख हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते .यांनी 26 नोव्हेंबर संविधान दिवस यानिमित्ताने घटनासमीती व तीची निर्मिती आणि महत्व या विषयावर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व सर्वांकडुन भारतीय संविधानाच्या प्रस्थावनेचे वाचन करुन घेतले .याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शरयू तायवाडे अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या . त्यांनी संविधान दिवसाचे महत्त्व पटवून दिले.विद्यार्थ्यांच्या मनामध्ये राष्ट्र सेवेची भावना निर्माण व्हावी व त्यानां बाबासाहेब आंबेडकरांचा दुरदृष्टिकोन व समस्त मानवजातीचा विचार संविधान निर्माण करण्यामागे असल्याची जाणीव करुन दिली .हे संविधान किती उपयुक्त आहे हे विद्यार्थ्यांनी समजून घेतले पाहिजे. असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.याप्रसंगी मंचावर राष्ट्रीय सेवा योजना अधीकारी डॉ.कीशोर घोरमाडे उपस्थित होते
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.वर्षा वैद्य इंग्रजी विभाग प्रमुख, तर आभार प्रदर्शन डॉ.चंचल देशमूख यांनी केले. या कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजना समितीचे सदस्य ,सर्व प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते .