*उमंग गीताई कॉलेज मध्ये ७२ वा संविधान दिवस साजरा करण्यात आला*
नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले
कोराडी:- “उमंग गीताई कॉलेज ऑफ वूमेन्स एज्युकेशन”, कोराडी रोड, पांजरा, नागपूर येथे रासेयो विभागाच्या वतीने ७२ व्या संविधान दिवसा निमित्त “माझा संविधान माझा अभिमान” उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या संचालिका श्रीमती. वैशाली फुले प्रमुख पाहुणे म्हणून लाभल्या होत्या. त्याचप्रमाणे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अतुल टेकाडे हे देखील उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये विद्यार्थी व शिक्षकाद्वारे भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीमती वैशाली फुले यांनी भाषणामध्ये भारतीय संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेल्या परिश्रमाचे वर्णन करून भारतीय संविधानाने कशाप्रकारे विविधतेमध्ये एकता स्थापित करण्याचे काम केले हे सुद्धा त्यांनी समजावून सांगितले.
त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अतुल टेकाडे यांनी त्यांच्या भाषणामध्ये, भारतीय संविधानाची प्रस्तावना सर्वानाच प्रेरणा देणारी आहे असे सांगितले. प्रास्ताविके मध्ये असलेले शब्द धर्मनिरपेक्ष, समाजवाद, समता हे स्वतःमध्येच विशिष्ट आहे. संविधानाने सर्व लोकांना समानतेचा हक्क आणि अधिकार दिलेले आहे त्यानंतर महाविद्यालयातील प्राध्यापक व रासेयो प्रमुख तृप्ती डोंगरे यांनी भाषणामध्ये संविधानाचे मूलभूत हक्क आणि अधिकार समजवून संविधानाप्रमाणे वागणे यामध्येच सर्वांचे हितसंबंध सुरक्षित आहे असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी महाविद्यालयातर्फे ऑनलाइन निबंध स्पर्धा व पोस्टर मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सहभागी सर्व विद्यार्थिनींना ऑनलाइन प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. तसेच महाविद्यालयात विद्यार्थिनींची भाषणे व डिबेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ह्या कार्यक्रमामध्ये सुमारे ७५ विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.
या प्रसंगी कॉलेजचे सर्व शिक्षकवृंद प्रा. रुबिका नारनवरे, डॉ. निर्मला सूर्यवंशी, प्रा. रश्मि ऊईके, प्रा. रोशनी डहारे, रासेयो प्रमुख प्रा. तृप्ती डोंगरे, प्रा. प्रिती मानकर, प्रा. हुस्ना झकी, प्रा. कविता कनोजिया, प्रा. निशा गिरजापुरे तसेच सहकर्मचारी निलेश मेश्राम, पवन करमेले, श्रीमती दीपाली उईके, ग्रंथपाल, श्री गौरव गावंडे, मधुकर डांगे, दर्शना व वंदना यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली. प्रास्ताविक प्रा. कु. हर्षदा गजभिये बॅचलर ऑफ न्यूट्रीशन अँड डायटेटिक्स भाग-१ तर आभार प्रदर्शन कु. प्राची हनवट भाग १ ह्यंनी केले.
Maharashtra News Media सच की आवाज