Breaking News

*महाराष्ट्र कामगार कल्याण केन्द्र खापरखेडा येथे दिनांक २२/११/२०२१ ला ८४ वा वर्धापनदिन कार्यक्रम व कौमी एकता सप्ताह अन्तर्गत दुर्बल घटक दिवस कार्यक्रम संपन्न*

*महाराष्ट्र कामगार कल्याण केन्द्र खापरखेडा येथे दिनांक २२/११/२०२१ ला ८४ वा वर्धापनदिन कार्यक्रम व कौमी एकता सप्ताह अन्तर्गत दुर्बल घटक दिवस कार्यक्रम संपन्न*


नागपुर उपजिल्हा प्रतिनिधि दिलीप येवले
नागपुर:- महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट क्रमांक २ अन्तर्गत कामगार कल्याण केन्द्र खापरखेडा येथे दिनांक २२/११/२०२१ रोजी कौमी एकता सप्ताह अन्तर्गत दुर्बल घटक दिवस तसेच ८४ वा वर्धापनदिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष पद मा. श्री. मनोहर आडकिने ( गुणवंत कामगार पुरस्कृत)पाहुणे मा. श्री. पुरुषोत्तम मानकर ( गुणवंत कामगार पुरस्कृत) व्याख्याते मा. श्री. विजय लंगडे (ग्रामसेवक) मा. सौ. पोर्णिमा कोटागंडे ( ब्यंक आफ बडोदा) सर्व मान्यवरांचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. ग्रामसेवक यांनी घरकुल व तसेच काही योजनांची माहती दिली. तसेच सौ. कोटागंडे यांनी दुर्बल घटक दिवस ह्या कार्यक्रम मा मार्फत ब्यंकेतुन मिळणारे उपक्रमाची माहिती दिली. तसेच मान्यवरांनी कौमी एकता सप्ताह व २२ नोव्हेंबर वर्धापनदिन कार्यक्रमा बद्दल आप आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या माध्यमातून मा दुर्गा महिला मंडळ च्या श्रीमती त्रिवेणी चिखले व त्यांच्या गटाने विविध प्रकारचे भजन सादर केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ. शालु टेकाडे ( केन्द्र महिला कल्याण सहाय्यिका) यांनी केले.


कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ. मंदा सोनुरकर, सौ. नलिनी बेडेकर, आशिष भालेराव पुनम सय्यामे शकुंतला ठवरे संगणक वर्गातील विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …