*कन्हान येथे स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे जुगार अड्ड्यावर धाड*

*कारवाई दरम्यान १० जुगार आरोपी अटक , सह १ लाख १२ हजार पाचशे चा मुद्देमाल जप्त*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन लागत नगरपरिषदेच्या बाजुला मच्छी मार्केट कन्हान येथे स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण पथकाने धाड मारून क्रिडामंडळ या नावाने रमी अवैधरित्या क्लब नावाखाली तासपत्यावर पैश्याची बाजी लावुन कॉईनच्या मदतीने हारजीत चा जुगार खेळताना रंगेहाथ १० आरोपींना पकडुन त्याचा जवळुन १ लाख १२ हजार पाचशे रूपयांचा मुद्देमाल जप्त करून पुढील कारवाई करिता कन्हान पोलीसाच्या स्वाधिन करण्यात आले.
सुत्रान कडुन मिळालेल्या माहिती नुसार स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा नागपुर ग्रामिण च्या पथकाने कन्हान पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या नगरपरिषद कन्हान च्या बाजुला मच्छी मॉर्केट कन्हान येथील रामु यादव यांच्या दुकाना च्या पहिल्या माळयावर शुक्रवार दिनांक.२६ नोहेंबर ला रात्री ८ वाजता दरम्यान अचानक धाड मारून क्रिडा मंडळ या नावाने रमी क्लब नावाखाली अवैधरित्या तास पत्यावर पैश्याची बाजी लावुन कॉईनच्या मदतीने हारजीत चा जुगार खेळतांना रंगेहाथ १० आरोपीना पकडले. यात आरोपी १) राजु कैलास कोलते ४९ वर्ष राह. कवडस हिंगणा, २) नितीन दयाराम चौधरी वय २५ वर्ष, पारडी नागपुर, ३) चरण कल्लन गौर वय ५७ वर्ष राह पाचपावली नागपुर, ४) दामोधर हेमराज कुही कर वय ५९ राह जुनी मंगळवारी नागपुर, ५) शेख फारूख शेख महम्मुद वय ४० वर्ष राह मोठा ताजबाग नागपुर, ६) मनोज ज्ञानचंद जैन वय ५६ वर्ष राह वर्ध मान नगर नागपुर, ७) अकुंश तुकाराम भोवते वय ४४ वर्ष राह भांडेवाडी नागपुर, ८) शेख शाहीद शेख वजीर झीया वय ४२ वर्ष रायपुर हिंगणा, ९) मोहम्मद जावेद अब्दुल रफिक खॉ वय ४४ वर्ष राह जाफरनगर नागपु र, १०) फरीद इलियास चिनी ३२ वर्ष राह. मालगुजारी पुरा, वर्धा यांना रंगेहाथ पैश्याच्या हारजित चा जुगार खेळतांना पकडुन त्याच्या जवळील नगदी २६,६०० रूपये, ७ मोबाईल किंमत ८५५०० रूपये व जुगार खेळण्याचे साहित्य ४०० रूपये असा एकुण १ लाख १२ हजार ५०० रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. क्रिडा मंडळाच्या नावाने जुगाराचा खेळ चालविणारा मनोज ज्ञानचंद जैन यास धर्मादाय आयुक्ताचा रमी क्लब चा परवाना विचार ला असता त्यांचे कडे तो नसल्याने स्थानिय गुन्हे अन्वेशन शाखा नागपुर ग्रामिण च्या पथकाने कलम ४, ५ मु जु का अन्वये कारवाई करून कन्हान पोलीसांना पुढील कारवाई करिता स्वाधिन करण्यात आले. ही कारवाई स्थानिय गुन्हे अन्वेशन शाखा नागपुर ग्रामिण चे पोलीस सहाय्यक निरिक्षक अनिल जिट्टेवार यांचा मार्गदर्शनात पोलीस उप निरिक्षक अनिल राऊत, पोलीस हवालदार नाना राऊत, विनोद काळे, शैलेश यादव, सत्यशिल कोठारे, प्रणय बनाफर, पोलीस वाहन चालक साहेबराव बिहाडे आदि ने शिताफीने ही कारवाई यशस्विरित्या पार पाडली.
सदर प्रकरणा चा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे निरिक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार नरेश वरखडे हे करित आहे.
Maharashtra News Media सच की आवाज