*कन्हान येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथि साजरी*


*विविध संघटने द्वारे ठिकठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 131 व्या पुण्यतिथी निमित्य कार्यक्रमाचे आयोजन सार्वजनिक वाचनालय हनुमान नगर येथे व कन्हान शहर विकास मंच , भाजपा अनु सुचित जाती मोर्चा पारशिवनी तालुका द्वारे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मान्यवरांचा हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथि साजरी करण्यात आली .
सार्वजनिक वाचनालय , कन्हान
सार्वजनिक वाचनालय हनुमान नगर कन्हान येथे थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 131 व्या पुण्यतिथी निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री वासुदेवराव चिकटे यांच्या हस्ते व जयरामजी इंचलवार यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असुन प्रमुख अतिथि यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर उपस्थितांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित सर्व नागरिकांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन तसेच दोन मिनटाचा मौन धारण करुन महात्मा ज्योतिबा फुले यांना भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित करुन पुण्यतिथि साजरी करण्यात आली .
या प्रसंगी मनोहर कोल्हे , दिनकरराव मस्के , अभिषेक निमजे , रवि राणे , उद्य पाटी , स्वप्नील वकलकर सह आदि सभासद व वाचक प्रामुख्याने उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सुत्र संचालन कृणाल कोल्हे यांनी केले तर आभार दिनकरराव मस्के यांनी मानले .
कन्हान शहर विकास मंच
कन्हान शहर विकास मंच द्वारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 131 व्या पुण्यतिथी निमित्य कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मंच संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये मंच मार्गदर्शक भरत सावळे यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता मंच पदाधिकारी महेश शेंडे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर सर्व मंच पदाधिकार्यांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित सर्व मंच पदाधिकार्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथि साजरी करण्यात आली .
या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच चे संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर , मार्गदर्शक भरत सावळे , महेश शेंडे , हरीओम प्रकाश नारायण , शाहरुख खान , अक्षय फुले , शुभम मंदुरकर , महेंद्र साबरे , सुरज वरखडे , प्रकाश कुर्वे , हर्ष पाटील , किरण ठाकुर , सह आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते .
भाजपा अनु सुचित जाती मोर्चा पारशिवनी तालुका
भाजपा अनु सुचित जाती मोर्चा पारशिवनी तालुका द्वारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्य कार्यक्रमाचे आयोजन गहुहिवरा चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित श्री श्री फाँऊनडेशन चे अध्यक्ष संकेत बावनकुळे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात उपस्थित सर्व भाजपा पदाधिकार्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन तसेच दोन मिनटाचा मौन धारण करुन महात्मा ज्योतिबा फूले यांची पुण्यतिथि साजरी करण्यात आली .
या प्रसंगी रामभाऊ दिवटे , डॉ मनोहर पाठक , कामेश्वर शर्मा , शंकर चहांदे , अमोल साकोरे , रिंकेश चवरे , सचिन वासनिक , अमन घोडेस्वार , रुषभ बावनकर , सह आदि भाजपा पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .
Maharashtra News Media सच की आवाज