Breaking News

*कन्हान नगरपरिषद येथे हर घर दस्तक उपक्रमा संर्दभात बैठक संपन्न*

*कन्हान नगरपरिषद येथे हर घर दस्तक उपक्रमा संर्दभात बैठक संपन्न*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान – पिपरी नगरपरिषद नवीन इमारत येथे हर घर दस्तक उपक्रमा संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले असुन तहसिलदार प्रशांत सांगडे यांनी हर घर दस्तक उपक्रम संदर्भात अधिकार्यांना माहिती देत शहरातील सर्व घरातील प्रत्येक व्यकतीचे लसीकरण करण्याचे आवाहन केले. व नप मुख्याधिकारी हर्षल गायकवाड यांनी शिक्षक, आशा वर्कर, आंगणवाडी सेविका यांच्या समस्या जाणुन घेतल्या.
गुरूवार दिनांक.२५ नोव्हेंबर ला केंद्र शासनाच्या हर घर दस्तक उपक्रम संदर्भात मा. तहसीलदार प्रशांत सांगडे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक, आशा सेविका, आंगणवाडी सेविका यांची बैठक घेऊन तहसिलदार प्रशांत सांगडे यांनी सर्वांना हर घर दस्तक उपक्रमा संदर्भात माहिती दिली व कन्हान शहरातील सर्व घरामध्ये व घरातील प्रत्येक व्यक्तींचे लसीकरण व्हायला पाहीजे असे आवाहन केले. नप मुख्याधिकारी हर्षल गायकवाड यांनी लसीकरण संर्दभात शिक्षक, आशा सेविका, आंगनवाडी सेविका यांच्या समस्या जाणुन घेतल्या. याप्रसंगी पारशिवनी तहसिलदार प्रशांत सांगडे, नप मुख्याधिकारी हर्षल गायकवाड, वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश चौधरी, नोडल अधिकारी संकेत तलेवार, कार्यालय अधिक्षक हर्षल जगताप, स्वच्छता अभियंता फिरोज बिसेन सह शिक्षक वृंद, आशा सेविका, आंगण वाडी सेविका, नप अधिकारी कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …