Breaking News

*समतादुत प्रकल्प व्दारे विवेकानंद नगर कन्हान आंगणवाडीत संविधान दिवस साजरा*

*समतादुत प्रकल्प व्दारे विवेकानंद नगर कन्हान आंगणवाडीत संविधान दिवस साजरा*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – डॉ बाबासाहेब आंबेडकर संबोधन व प्रशिक्षण संस्था पुणे अंतर्गत समतादुत प्रकल्पा व्दारे २६ नोव्हेंबर संविधान दिवसा निमित्य आंगणवाड़ी केन्द्र क्रमांक. १४२ विवेकानंद नगर कन्हान येथे कार्यक्रमाचे आयोजन करून संविधान प्रास्ताविके चे वाचन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समातादुत शुभांगी टिंगने यांनी केले तर समतादुत सुनिता गेडाम यांनी संविधानाचे महत्वावर महिला व मुलींना मार्गदर्शन केले. तसेच आपल्या भारता देशाकरिता संविधानाचे योगदान किती मोलाचे आहे हे संविधान गित गाऊन समाजावुन सांगितले. कार्यक्रमाचे आभार आंगणवाडी सेविका रंजनीताई आहेर यांनी मानले. याप्रसंगी लक्ष्मीताई फुटाणे, रिंकु शिक्कुमार कनोजिया, दिपाली वानखेडे, विशाखा जाधव, योगीता भनारकर, सरिता बैस, खमुता कोहळे , गीता सोलंकी, प्रतिभा श्रीरामे, कविता कोहळे प्रामुख्याने उपस्थित राहुन संविधान दिवस थाटात साजरा केला.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …