*बौद्ध विहाराच्या “क”श्रेणीचा संर्वागिंण विकास करण्याचा संकल्प – रविन्द्र चिखले*
*नवीन बिना बुद्ध विहारात संविधान दिन साजरा*
सिल्लेवाडा – स्थानिक नवीन बिना बुद्ध विहारात भारतीय बौद्ध महासभा नवीन बिना व ग्रामपंचायत भांनेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष भानेगावचे सरपंच रविंद्र चिखले, तर प्रमुख अतिथी म्हणून पं. स. सावनेरचे गटविकास अधिकारी दिपक गरुड, पं. स. सभापती अरुणा ताई शिंदे, खापरखेडा विज केन्द्राचे मुख्य अभियंता राजू घुगे, सावनेर दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे अधिवक्ता हिरालाल सोमकुवर, भारतीय बौद्ध महासभा बुद्ध विहाराचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ.जितेन्द्र तागडे मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्र चिखले यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सर्वांनी अभिवादन केले.
कार्यक्रमाची सुरुवात संविधानाच्या उद्देश्शिकापत्रिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. तद्नंतर परिसरातील २६ जेष्ठ नागरिक, ६ गुणवंत विद्यार्थी, आणि विशेष सत्कार वंदना कुंभारे, एड.हिरालाल सोमकुवंर, मुख्य अभियंता राजू घुगे यांच्या शाल श् श्रीफळ व स्मृतीचिन्ह मान्यवरांच्या हस्ते देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकतेत भारतीय बौद्ध महासभा नवीन बिना भानेगावचे अध्यक्ष डॉ.जितेंद्र सावजी तागडे यांनी कार्यक्रमाचा उद्देश व पार्श्वभूमी स्पष्ट करतांना संविधानाचे महत्व विषद केले.तर कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच रवींद्र चिखले यांनी संविधान दिनाच्या शुभेच्छा देताना नवीन बिना बुद्ध विहाराचे “क” श्रेणीच्या अंतर्गत संर्वाणगीण विकास करण्याचा संकल्प जाहीर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमित चव्हाण,विक्री मेंढे यांनी केले तर आभार दिप्ती मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाला ग्रामपंचायत उपसरपंच प्रियंका उपासे, ग्रा.पं.सदस्य सतीश ढोके, शैलेश मरस्कोल्हे, कल्पना गजभिये,ज्योती भारावले, विजय वासनिक,बौद्ध महासभेचे जेष्ठ प्रवक्ते वामन रामटेके,मधुकर गौरकर,सावजी तागडे,प्रणय कुंभारे व परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.