*बिना -भानेगाव पूला ची पर्यायी व्यवस्था करून देण्यांची विनंती*
*रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानी दिले निवेदन*
*बिना -भानेगाव पूल जिथे समाप्त होतो तिथे स्पीड ब्रेकर ची व्यवस्था करा जेणेकरून स्पिड नियंत्रनात करता येईल व बाजार मुख्य मार्गावर न लावता आत मध्ये पर्यायी व्यवस्था करून देण्यांची विनंती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चिचोली सर्कल यांनी विविध समेस्येचे निवेदन खापरखेडा पोलीस स्टेशनला देण्यात आले*
नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी – दिलीप येवले
खापरखेडा:- भानेगाव उडान पुलावरून ये-जा करणाऱ्या वाहतुकीच्या संख्येत खूप प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे कोरोना काळात शाळा – महाविद्यालय बंद होते ते आता नियमित सुरू झाल्याने विद्यार्थ्यांची वर्दळ भानेगाव मुख्य मार्गावर जास्त प्रमाणात दिसून येत आहे हा मार्ग मुख्य असल्याकारणाने हा रस्ता नागरिकांच्या रहदारीचा सुद्धा आहे भानेगाव कोळसा खाणीतून कोळसा घेऊन येणारा ट्रक सरळ औष्णिक वीज केंद्रात प्रवेश करतो आणि असे निदर्शनास आले की त्या ट्रक ला उडानपुलावरून खाली उतरतांना वेग मर्यादा नसते त्याचप्रमाणे नवीन बिना इथे गुरुवारी सप्ताहिक बाजार असतो आणि कोणतेही वाहन खाली उतरतांना बघितल्यास मनात एक भीतीचे वातावरण तयार होते महत्त्वाचे म्हणजे पुलाच्या मुख्य मार्गावरच काही दुकानदार आपली दुकाने सजवतात आणि अश्यात वाहन अनियंत्रित झाले तर कोणतीही घटना नाकारता येत नाही म्हणून भविष्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता काहीतरी उपाय योजना कराव्यात असे निवेदन स्थानिक पोलिस स्टेशन ला देण्यात आले.
याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चिचोली सर्कल चे महासचिव सुमेध चव्हाण यांच्या नेतृत्वात स्थानिक पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले यावेळी प्रामुख्याने डॉ. जितेंद्र सावजी तागडे (अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा) सुभाष मेश्राम, प्रशांत पाटील, अनिल धनवटे, मनोज बेरड, अमोल कळंबे, विजय निकोळे, आशिष चहांदे, प्रीतम सोमकुवर, चक्रपाल पाटील, नेत्रपाल शेंडे, विजय ढोके, मंगेश सोनटक्के, मोनू ढोके, शुभम गणवीर, आकाश वासनिक, आदित्य धनवटे, संकेत वाहाने, पवन वानखेडे आदी उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज