Breaking News

*भारतीय संविधान दिननिमित्त भव्यरक्तदान शिबिर संपन्न*

*भारतीय संविधान दिननिमित्त भव्यरक्तदान शिबिर संपन्न*


नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले

नागपुर:- महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट क्र. 2 नागपूर येथे भारतीय संविधान दिननिमित्त तसेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या वर्षात सदर रक्तदान शिबिरा मध्ये 40रक्त दात्यानी रक्तदान केले. सदर रक्तदान शिबिरा मध्ये सविता येवले ह्या घरकाम करणाऱ्या महिलेने रक्तदान करून आदर्श घडविला. त्यांचे या कार्यक्रमात रोपटे देऊन कामगार कल्याण अधिकारी मा. प्रतिभा ताई भाकरे यांनी त्यांचे स्वागत केले.

 

तसेच प्रशासकीय गतिमानता अंतर्गत, मंडळाचे कल्याण आयुक्त माननीय रविराज ईळवें साहेब, तसेच नागपूर विभागाचे सहाय्यक कल्याण आयुक्त माननीय नंदलाल राठोड साहेब, तसेच विनोबाग्राम गट क्र. 2 येथील कामगार कल्याण अधिकारी माननीय सौ. प्रतिभा ताई भाकरे, यांच्या प्रमुख मार्गदर्शनात सदर कार्यक्रम संपन्न झाला. सदर कार्यक्रमास कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय अंकिता अग्रवाल, संचालिका शिवम फूड्स नागपूर या होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून मा. शंकररावजी वंजारी, से.नी. मुख्याध्यापक , तसेच आझाद खान, अध्यक्ष जमाते इस्लाम नागपूर, तसेच शंकररावजी ढबाले, तसेच साईनाथ रक्त पेढीचे मेडिकल ऑफिसर डॉ. हरीश कळमकर तसेच तांत्रिक विभाग प्रमुख अनिल ढोणे व संपूर्ण चमू उपस्थित होते. सर्व प्रथम दीप प्रज्वलन करून , तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कामगार कल्याण अधिकारी मा. सौ. प्रतिभाताई भाकरे यांनी केले तसेच मंडळाच्या योजनांची आणि भारतीय संविधानाची माहिती दिली. तसेच नागपूर विभागाचे सहाय्यक कल्याण आयुक्त मा श्री. नंदलाल राठोड साहेब यांनी सदर कार्यक्रमास शुभेच्छा देऊन अश्या प्रकारचे सेवाभावी कार्य महाराष्ट्र कामगार मंडळ करत राहील अशी ग्वाही दिली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. शंकररावजी वंजारी यांनी मंडळ करत असलेल्या कार्याची प्रशंसा केली. नंतर श्री. शंकररावजी ढबाले यांनी भारतीय संविधान उद्येशिका याचे वाचन केले. नंतर आझाद खान यांनी संविधान दिना निमित्त कुराण आणि इतर पुस्तकाचे साहित्य ललित कला भवन येथील ग्रंथालयासाठी कामगार कल्याण अधिकारी मा. प्रातिभा ताई भाकरे यांना भेट दिली. साईनाथ रक्त पेढी च्या वतीने सहाय्यक कल्याण आयुक्त नंदलाल राठोड साहेब व कामगार कल्याण अधिकारी मा. प्रतिभा ताई भाकरे यांना रक्त दान कार्यक्रमाचे आयोजन केल्या बद्धल मोमेंटो देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. सुनील चव्हाण यांनी केले
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. सचिन रोडगे , दर्शन सोमकुवर ,निमजे ,पंकज हांडे, मनीष सोनी , प्रमोद कलंबे, मारोती मोकाशी, सुजाता जाधव, मनीषा कुथे, विद्या , बोपुलकर, सातपुते, यांनी सहकार्य केले.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …