*तायवाडे महाविद्यालयात रोटरॕक्ट क्लबची स्थापना*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी – दिलीप येवले
कोराडी:- तायवाडे महाविद्यालय , महादुला-कोराडी आणि रोटरी क्लब ग्रीन सीटी नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरॕक्ट क्लबची प्रतिष्ठापना करण्यात आली .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ . शरयू तायवाडे होत्या . याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून रोटरी क्लब नागपूर ग्रीन सीटीच्या अध्यक्ष डॉ. शारदा रोशनखेडे ,डिस्ट्रीक्ट 3030 चे रोट्रक्ट चेअरमन रोट्रीयन निशिकांत काशीकर, रोटरी क्लब नागपूरचे पूर्वाध्यक्ष रोट्रीयन विवेक देशपांडे , रोट्रीयन पद्मा देठे , रोट्रीयन नेत्रा देशपांडे , रोट्रीयन पटेल साहेब प्रामुख्याने उपस्थित होते .

याप्रसंगी रोटरी क्लबच्या जिल्हाध्यक्ष डॉ . शारदा रोशनखेडे यांनी रोटरी क्लबची सामाजिक उदि्दष्टे सांगीतली . रोटरी क्लब हा १४५ देशामध्ये अकरा हजार क्लबच्या माध्यमातून कार्य करीत असल्याचे सांगून त्याच्या विस्ताराची विस्तृत माहिती दिली . युवकांना सामाजिक कार्याची आवड निर्माण होण्यासाठी महाविद्यालय स्तरावर रोटरॕक्ट क्लब स्थापन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले . याप्रसंगी डिस्ट्रीवर 3030 चे रोटरॅक्ट चेअरमन निशिकांत काशीकर यांनी रोटरी क्लबतर्फे साकारलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली व विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यासाठी प्रदीप्त प्रेरणा देणारा क्लब असल्याचे सांगीतले . याप्रसंगी अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉ . शरयू तायवाडे यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे रोटरॕक्ट मंडळ जाहीर करून त्यांच्या कार्याची जबाबदारी सोपविली . रोटरॕक्ट क्लबची महाविद्यालयातील युवकांनी करावयाच्या कामांची जाणीव करून दिली . विद्यार्थ्यांना सामाजिक , समर्पित भावनेने कार्य करण्याची संधी प्राप्त झाल्याचे पाहून आनंद व्यक्त केला . याप्रसंगी डॉ . शरयू तायवाडे यांना रोटरी क्लबचे सदस्यत्व बहाल करण्यात आले .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ . वर्षा वैद्य यांनी केले . संचालन डॉ . कोमल ठाकरे यांनी तर आभार रा.से.योजना समीती समन्वयक डॉ .कीशोर घोरमाडे ह्यांनी मानले .या कार्यक्रमाला डॉ.विजय चरडे,डॉ. चंचल देशमुख , डॉ .वकील शेख आणि महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते .
Maharashtra News Media सच की आवाज