Breaking News

*युवा चेतना मंच तर्फे संविधान दिवस थाटात साजरा*

*युवा चेतना मंच तर्फे संविधान दिवस थाटात साजरा*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान कांन्द्री येथील युवा चेतना मंच तर्फे २६ नोव्हेंबर संविधान दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन आंबेडकर चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित युवा चेतना मंच च्या पदाधिकार्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात केली असता कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थितांना युवा चेतना मंच च्या पदाधिकार्यांनी मार्गदर्शन करीत सांगितले कि ज्या संविधानामुळे आज आपला देश चालतो त्याविषय सर्व नागरिकात माहिती व्हावी व नागरिकांना संविधानातील कलमाची माहिती व्हावी संविधानाविषय माहिती व्हावी या उद्देशाने संविधान दिवस साजरा करण्यात आला .
या प्रसंगी युवा चेतना मंच नागपूर ग्रामीण चे अध्यक्ष प्रा.पराग सपाटे,स्वाती गोंडणे मॅडम,
युवा चेतना मंच चे विनोद कोहळे, रिंकेश चवरे , रुपाली नाटकर,अंगद पत्रे, प्रफुल्ल सिंगाडे,आयुष यादव आशुतोष सिंग,तनुश्री आकरे प्रफुल बावनकुळे, प्रिया निमकर सह आदि नागरिक उपस्थित होते.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …