*जुन्या भांडणाच्या कारणावरून एकमेकांना मारहाण*

*कन्हान पोलीस स्टेशन ला दोन्ही पक्षा विरूध्द गुन्हा दाखल*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत ०.५ किलो मीटर पश्चिम भागास असलेल्या स्वामी विवेकानंद नगर येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून चार आरोपींनी ईनेश पुरवले व त्याच्या मित्राला हथबुक्याने व बासाचा काडीने मारहाण करून जख्मी केल्याने कन्हान पोस्टे ला चार आरोपी विरुद्ध आणि विवेश भिसे यांचे तक्रारीने दोन आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
प्राप्त झालेल्या माहिती नुसार मंगळवार दिनांक.२३ नोव्हेंबर ला १०:१५ ते १०:३० वाजता दरम्यान ईनेश नरेश पुरवले वय १९ वर्ष राहणार. स्वामी विवेकानंद नगर कन्हान हा आपले मित्रासह त्याचे दुकाना समोरील रोडवर उभा असतांना आरोपी १) सरगम पात्रे,२) समीर पात्रे ,३) सहदेव पात्रे, ४) विवेश भिसे सर्व राहणार. सत्रापुर कन्हान यांनी संगमत करून जुन्या भांडणाच्या कारणा वरून ईनेश पुरवेले च्या मित्राला मारहाण करित असतांना हा त्याला वाचविण्साठी गेला असता त्याला ही आरोपीतांनी हाथबुक्याने व बासाच्या काडीने मारहाण करित शिवीगाळ करून जिवाने मारण्याची धमकी दिली. अश्या फिर्यादी ईनेश नरेश पुरवले यांच्या तोंडी तक्रारीने कन्हान पोलीसांनी आरोपी १) सरगम पात्रे, २) समीर पात्रे,३) सहदेव पात्रे, ४) विवेश भिसे विरुद्ध अपराध क्रमांक. ४२६ /२०२१ कलम ३२४, ५०४, ५०६, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला. तसेच विवेश महेश भिसे वय १८ वर्ष राहणार. सत्रापुर याने सुध्दा कन्हान पोलीस स्टेशन ला तक्रार केली की, मित्रासह विवेकानंद येथील नातेवाईकांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमास जात असतांना आम रस्त्यावर आरोपी राहुल खडसे व ईनेश पुरवले हयांनी अश्लिल संगनमत करून अश्लिल शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देत हाथ बुक्याने मारहाण करून दुखापत केल्याच्या तोंडी तक्रारी वरून कन्हान पोलीसांनी आरोपी राहुल खडसे व ईनेश पुरवले विरूध्द अपराध क्रमांक ४२७/२०२१ कलम २९४, ३२३, ५०६, ३४ भादंवि अन्वये गुन्हा नोंद केला असुन कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक जावेद शेख हे दोन्ही गुन्हयाचा पुढील तपास करीत आहे.
Maharashtra News Media सच की आवाज