*बापरे.…नवरी चक्क घोड्यावर बसून लग्न मंडपात अवतरली…!*
नागपुर प्रतिनिधि : पवन किरपाने
नागपूर : नागपुरात एका लग्न समारंभात नवरी चक्क घोड्यावर बसून लग्नमंडपात अवतरली. ही आहे नागपुरातील एका लग्नातील विशेष वरात. साधारणतः लग्न म्हटले तर नवरदेव हा घोडी वर बसून वरतीतून लग्न मंडपामध्ये येत असतो. परंतु नागपुरात एक नवरी घोडीवर बसून लग्नमंडपात पोहोचली. नागपुरातील झिंगाबाई टाकळी परिसरातील अंजनाताई मंगल कार्यालयात 30 नोव्हेंबर 2021 रोजी डॉली राऊत हिचा विवाह सोहळा आशिष शिंदे या युवकासोबत पार पडला. लग्नमंडपात जाण्यापुर्वी डॉलीने घोड्यावर बसून आपली वरात अत्यंत थाटात काढली, इतकच नव्हे तर तिचा हा स्वॅग लूक बघून उपस्थित नातेवाईकांना सुद्धा आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. नागपुरातील ही अनोखी वरात उपस्थित नातेवाईकांसोबतच रस्त्यावरील नागरिकांसाठी सुद्धा एक वेगळा कुतूहलाचा विषय निर्माण झाला होता.