*घरकुल आवास बांधकाम तात्काळ सुरु करण्याची मागणी*
*नागरिकांचे नप मुख्याधिकार्यांना निवेदन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान – पिपरी शहरातील गरजु नागरिकांनी नगर परिषद कार्यालय येथे इंदिरा गांधी आवास योजनेचे घरकुल आवास मिळण्याकरिता अर्ज दाखल केले होते . परंतु आजपर्यंत या योजनेचा लाभ गरजु नागरिकांना मिळाला नसल्याने सामाजिक कार्यकर्ता प्रशांत बाजीराव मसार यांनी नप मुख्याधिकारी यांना भेटुन चर्चा करुन तसेच एक निवेदन देऊन तात्काळ घरकुल आवास बांधकाम योजना सुरु करण्याची मागणी केली आहे .
निवेदनात सांगितले कि वर्ष २०१८-१९ च्या वेळेस शहरातील गरजु नागरिकांनी कन्हान – पिपरी नगरपरिषद कार्यालयात इंदिरा गांधी आवास योजनेचे घरकुल आवास मिळण्याकरिता अर्ज दाखल केले होते परंतु आज पर्यंत या योजनेचा लाभ गरजु नागरिकांना मिळाला नाही . आजु बाजुच्या शहरा लगत च्या ग्रामीण भागात ही योजना सुरु असुन सुद्धा ,नगरपरिषद अंतर्गत अद्यापही गरजु नागरिकांना लाभ मिळत नसल्यामुळे नागरिकांनी नगर परिषद प्रशासन च्या कार्यप्रणाली विरुद्ध रोष व्यक्त केला आहे . सामाजिक कार्यकर्ता प्रशांत बाजीराव मसार यांनी नप मुख्याधिकारी यांना भेटुन चर्चा करुन तसेच एक निवेदन देऊन तात्काळ घरकुल आवास बांधकाम योजना सुरु करण्याची मागणी केली आहे .
याप्रसंगी प्रशांत बाजीराव मसार,चंदन मेश्राम ,अरुण वाघधरे,आनंद भुरे, रमेश ठाकरे, बंडू केवट, बोला भोयर,कुंदन रामगुंडे, अशोक मेश्राम, प्रवीण ढोमणे, सागर भोयर ,राजु चौरे , संजय गुडदे, प्रल्हाद पहाडे,विलास कुंभारे, कुणाल खडसे, ऋषभ हावरे, भूमिका परतेकी, माधुरी गावंडे, शालू कावडे, शांताबाई भोयर, वर्षा ठाकरे, कविता बावणे, कंचन चवरे, सह आदि नागरिकगण उपस्थित होते .