Breaking News

*बोलोरो पिकअप वाहनाची दुचाकी ला धडक, दुचाकी स्वार संतोष सहारे चा मुत्यु* *फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन येथे बोलोरो पिकअप चालका विरुद्ध गुन्हा दाखल*

*बोलोरो पिकअप वाहनाची दुचाकी ला धडक, दुचाकी स्वार संतोष सहारे चा मुत्यु*

 

*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन येथे बोलोरो पिकअप चालका विरुद्ध गुन्हा दाखल*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत टेकाडी उडाण पुल वळणा जवळ एका बोलोरो पिकअप चालकाने आपले वाहन भरधाव वेगाने व निष्काळजी पणाने चालवुन दुचाकी ला मागुन जोरदार धडक मारल्याने दुचाकी चे संतुलन बिघडुन समोर असलेल्या दुचाकी वाहनाला धडक बसल्याने चोघेही खाली रोडवर पडल्याने दुचाकी मागे बसलेला संतोष सहारे याच्या डोक्याला जबर मार लागल्याने उपचारार्थ कामठी खाजगी दवाखान्यात दाखल केले असता दुसऱ्या दिवसी त्याचा उपचारा दरम्यान मृत्यु झाल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांच्या तक्रारी वरून बोलोरो पिकअप वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.


प्राप्त झालेल्या माहिती नुसार शनिवार ला दुपारी १ वाजता दरम्यान सतीश प्रितम बसोने वय १९ वर्ष राहणार. वारेगाव वार्ड क्रमांक.१ पोस्ट बिना हा शंकरराव चव्हाण काॅलेज खापरखेडा येथे गेला असता त्यांचा मित्र मृतक संतोष मुन्ना सहारे हा भेटुन त्याने म्हटले कि आपण दखने हायस्कुल कन्हान येथुन माझा डिप्लोमा घ्यायला जाऊ असे म्हटल्या नंतर सतिश बसोने व मृतक संतोष सहारे मिळुन दोघे मृतकाच्या भावाच्या स्पेंडर दुचाकी वाहन क्रमांक. एम एच ४० सीई १९७० ने कन्हान आले. त्यांचे शाळेचे कागदपत्रे घेतले आणि कन्हान येथील मित्र शैलेश व कृणाल बावने यांना फोन केला. त्यानंतर मृतक संतोष च्या मित्राला भेटण्याकरिता मनसर ला दोन दुचाकीने चोघे ही जात असतांना दुपारी २:४५ वाजता दरम्यान टेकाडी उडाण पुलाच्या वळणाजवळ पाठी मागुन येणाऱ्या बोलोरो पिकअप वाहन चालकाने आपले वाहन भरधाव वेगाने व निष्काळजी पणाने चालवुन दुचाकी ला जोरदार धडक मारल्याने सतिश बसोने यांचे वाहनाचे संतुलन बिघडल्याने समोर असलेल्या कृणाल व शैलेश च्या दुचाकी वाहनाला धडक लागुन सतिश व मृतक हे दोघेही गाडीच्या खाली रोड वर पडले व बोलोरो पिकअप वाहन चालक न थांबता पडुन गेला. सतिश बसोने , कृणाल व शैलेश यांना मार न लागता संतोष सहारे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यास उपचारा करिता प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान येथे नेले असता डाॅक्टरांनी प्राथमिक उपचार करून मार जास्त असल्याने कामठी ला पाठविले. त्यास कामठी येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले. दुसऱ्या दिवसी मंगळवार ला सायंकाळी ६ वाजता संतोष मुन्ना सहारे यांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी सतिश बसोने यांच्या तक्रारीवरून आरोपी बोलोरो पिकअप वाहन चालका विरुद्ध कलम ३०४, २७९, ३३७ भादंवि सह कलम १८४, ३४ (ए), ३४ (बी) अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …