Breaking News

*टेकाडी येथील एका इसमाचा अहवाल कोरोना पाॅझीटिव्ह* *कन्हान परिसरात खळबळ* *शासनाच्या नियमाचे काटेकोर पणे पालन करा – स्थानिक प्रशासन*

*टेकाडी येथील एका इसमाचा अहवाल कोरोना पाॅझीटिव्ह*

*कन्हान परिसरात खळबळ*

*शासनाच्या नियमाचे काटेकोर पणे पालन करा – स्थानिक प्रशासन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पासुन काही अंतरावर असलेल्या टेकाडी नविन वसाहत येथील रहिवासी
तियास तन्मय मोडक युवका चा अहवाल कोरोना पाॅझीटिव्ह आल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली असुन भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे . सध्या युवकाला नागपुर खाजगी रूग्णालयात दाखल करून व्हनटिलेशन लावुन पुढील उपचार सुरू केला आहे.
सुत्रान कडुन प्राप्त झालेल्या माहिती नुसार वेकोलि टेकाडी नविन वसाहत येथील रहिवासी तियास तन्मय मोडक वय १८ वर्ष हा काही दिवसापुर्वी कोलकत्ता वरून आला होता. त्याची प्रकृती बिघडल्याने बुधवार दिनांक.१ डिसेंबर ला त्यास उपचाराकरिता नागपुर च्या खाजगी रूग्णालयात भर्ती करण्यात आले. त्याचा कोरोना अहवाल पॉझीटिव्ह आल्याने ऑरेंज सिटी हॉस्पिटल नागपुर येथे व्हँनटिलेशन लावुन उपचार सुरू आहे. कन्हान परिसातील वेकोलि टेकाडी नविन वसाहत येथील कोरोना रूग्ण आढळल्याने आरोग्य विभाग व शासकीय यंत्रणेची जवाबदारी वाढुन नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमाची काटेकोर पणे पालन करावे असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश चौधरी हयांनी केले आहे.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …