Breaking News

*कन्हान वाघधरे वाडी येथे युवा क्रांती संघटने व्दारे आशा वर्कर , आंगणवाडी सेविका व परिचारिका यांच्या सत्कार*

*कन्हान वाघधरे वाडी येथे युवा क्रांती संघटने व्दारे आशा वर्कर , आंगणवाडी सेविका व परिचारिका यांच्या सत्कार*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान वाघधरे वाडी येथे युवा क्रांती संघटन द्वारे आशा वर्कर्स दिना निमित्य कार्यक्रमाचे आयोजन वाघधरे वाडी येथील आंगनवाडी च्या सभागृहात मध्ये करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित सर्व आशा वर्कर , आंगणवाडी सेविका , व आरोग्य विभागाच्या परिचारिका यांच्या सत्कार करुन कोरोशा योद्धा आशा वर्कर्स ,परिचारिका,अंगनवाडी सेविका,मदतनिस यांचा सत्कार करुन आशा वर्कर्स दिन थाटात साजरा करण्यात आला .


मागील दीड ते दोन वर्षापासुन देशासह , राज्यात , जिल्ह्यात व शहरात कोरोना चा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते . केंद्र व राज्य शासना च्या आदेशानुसार पाराशिवनी तालुक्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंन्द्रात व अंगनवाडी मध्ये सर्व आशा वर्कर , आंगणवाडी सेविका , मदतनिस, आरोग्य विभागाचे परिचारिका घरोघरी जाऊन दस्तक देत नागरिकांना कोरोना च्या महत्व समजवुन ,फ्री मध्ये लसीकरण देत असल्याने कोरोना चा प्रादुर्भाव कमी झाला . या कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आशा वर्कर , अंगणवाडी सेविका , मदतनिस आरोग्य विभागाच्या परिचारिका जोखीम पत्करून लसीकरणाचे कार्य रोज दिवस रात्र करीत आहेत़. अशा उत्कृष्ट कार्य करणार्या कोरोना योद्धा महिलांचा अशा वर्कर्स दिनाचे औचित्य साधुन युवा क्रांती संघटन कन्हान द्वारे वाघधरे वाडी येथील अंगणवाडी च्या सभागृहात मध्ये पुष्प गुच्छ देऊन भव्य सत्कार करण्यात आला असुन वाघधरे वस्तीतील नागरिकांना जास्तीत जास्त संख्येने कोविड लस घेण्याकरिता प्रोत्साहित करण्यात आले आहे .
या प्रसंगी युवा क्रांती संघटने चे पदाधिकारी श्री समशेर पुरवले , नंदकिशोर बर्वे , सुधीर पोनिकर , आकाश बनकर , बल्लू पुरवले , सोमलाल पात्रे , सतीश पात्रे , प्राण नाडे , सह आदि युवा क्रांती संघटने चे पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …