*कन्हान येथे प्रहार दिव्यांग संघटन द्वारे जागतिक दिव्यांग दिवस थाटात साजरा*
*जेष्ठ नागरिक मंडळा कडुन १३ हजार रुपए राशी दिव्यांग बांधवांना भेट*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – प्रहार दिव्यांग संघटन द्वारे जागतिक दिव्यांग दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन स्वामी विवेकानंद नगर येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मान्यवरांचा हस्ते व दिव्यांग बांधवांनी केक कापुन कार्यक्रमाची सुरवात केली असता कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित माजी नप नगराध्यक्षा अॅड आशा पनिकर व सद्गुरु जेष्ठ नागरिक मंडळ पदाधिकारी जी.एल.मेहरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले . या प्रसंगी सद्गुरु जेष्ठ नागरिक मंडळ पदाधिकारी यांनी जागतिक दिव्यांग दिवस निमित्य सर्व दिव्यांग बांधवांना पुष्प गुच्छ देऊन सत्कार करीत व १३,००५ रुपय नगद देऊन जागतिक दिव्यांग दिवस थाटात साजरा करण्यात आला .

या प्रसंगी सद्गुरु जेष्ठ नागरिक मंडळ पदाधिकारी प्रभाकरजी महाजन , जी एल मेहरे , बी बी पोटभरे , रामदासजी बावनकुळे , किशनजी राऊत , देवरावजी कावळे , माजी नप नगराध्यक्षा अॅड आशाताई पनिकर सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता राजु राऊत , प्रवीण शेंडेमेश्राम , अजय करमबार , सह आदि दिव्यांग बांधवांनी उपस्थित राहुन सहकार्य केले . , राजेश्वरी पिल्ले , सुभाष मेश्राम , अस्लाम शेख , निलु गोंडाने , सह आदि दिव्यांग बांधवांनी उपस्थित राहुन सहकार्य केले
Maharashtra News Media सच की आवाज