Breaking News

*नागपूर जिल्ह्यात मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन दिन साजरा*

*नागपूर जिल्ह्यात मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन दिन साजरा*

नागपूर – हिंगणा तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषदेचा ८३ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. उजवल हॉस्पिटल व हिंगणा तालुका पत्रकार संघाच्या वतीने तालुक्यातील सर्व पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या आरोग्य शिबिराचे उद्घाटन नागपूर जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष सुभाष वऱ्हाडे यांच्या हस्ते करण्यात आले. तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉ रमेश पाटील, उज्वल हॉस्पिटलचे संचालक डॉ शितल उमरे, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सुनील भोंबळे, संजय खळतकर,सोपान बेताल ,राजेंद्र सांभारे यांनी पत्रकारानी नियमित आरोग्य तपासणी करण्याचे आवाहन केले. यावेळी पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …