Breaking News

*उमंग गीताई कॉलेज ऑफ वूमेन्स एज्युकेशन नागपूर मध्ये एड्स जनजागृती च्या कार्यक्रमाचे आयोजन*

*उमंग गीताई कॉलेज ऑफ वूमेन्स एज्युकेशन नागपूर मध्ये एड्स जनजागृती च्या कार्यक्रमाचे आयोजन*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले
कोराडी:- जागतिक एड्स दिवस म्हणून १ डिसेंबर हा दिवस सर्वत्र पाळला जातो. या दिवसाचे औचित्य साधून उमंग गीताई कॉलेज ऑफ वूमेन्स एज्युकेशन, नागपूर यांच्या वतीने एड्स जनजागृती च्या कार्यक्रमाचे महाविद्यालयात आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या रासेयो व रोट्रॅक्ट विभागा द्वारे कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांद्वारे भाषण व पोस्टर सादर करून समाजामध्ये आपण कशा प्रकारे जनजागृती करू शकतो याचे प्रत्यक्ष उदाहरण सादर केले. उपस्थित विद्यार्थिनी पैकीं कु. प्राची हनवत व ट्वीकंल भावतकर बॅचलर ऑफ न्यूट्रिशन एन्ड डायटेटिक्स विभाग भाग-२ आणि नीलिमा बोन्द्रे फॅशन एन्ड अँपेरल डिजाइन भाग- १ यांनी आपले विचार मांडले तर पोस्टर प्रेझेंटेशन द्वारे कु. मेघा लाहारे, कु. अर्पिता मानवटकर, कु. मीना नानोटे, कु. किरण झेलगोंडे, कु. रिमझिम मैत्री यांनी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. इशिता चावला बॅचलर ऑफ न्यूट्रिशन एन्ड डायटेटिक्स भाग-१ तर आभार प्रदर्शन कु.मेघा लाहारे फॅशन एन्ड अँपेरल डिजाइन भाग- १ यांनी केले. कार्यक्रमात महाविद्यालयाचे शिक्षक प्रा. रुबिका नारनवरे, प्रा. रश्मी उईके रासेयो प्रमुख प्रा. तृप्ती डोंगरे, प्रा. कविता कनोजिया, प्रा. रोशनी डहारे, प्रा. प्रीती मानकर उपस्थित होते.
कार्यक्रमात एकूण ८७ विद्यार्थिनींनी आपला सहभाग नोंदविला.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …