Breaking News

*कन्हान येथे महापरिनिर्वाण दिवस निमित्य काढली कैंडल रैली* *भारतीय बौद्ध महासभा द्वारे कार्यक्रमाचे आयोजन*

*कन्हान येथे महापरिनिर्वाण दिवस निमित्य काढली कैंडल रैली*

*भारतीय बौद्ध महासभा द्वारे कार्यक्रमाचे आयोजन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान येथे भारतीय बौद्ध महासभा च्या महिलांनी महापरिनिर्वाण दिवस निमित्य कैंडल रैली काढुन व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करीत महापरिनिर्वाण दिवस साजरा करण्यात आला .


सोमवार दिनांक ६ डिसेंबर ला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिवस निमित्य भारतीय बौद्ध महासभा द्वारे कैंडल रैली चे आयोजन करण्यात आले होते . ही कैंडल रैली बुद्ध बिहार गणेश नगर कन्हान येथुन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन विनम्र अभिवादन करीत निघाली असता ही रैली गहुहिवरा चौक , सात नंबर नाका भ्रमण करुन डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथे पोहचली असता भारतीय बौद्ध महासभा च्या महिलांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व दीप प्रज्वलन करुन परिसर प्रकाशमय करुन “डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो” चा जयघोष केला . कार्यक्रमात उपस्थित सर्व नागरिकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन मानवंदना केली व दोन मिनटाचा मौन धारण करुन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित करुन महापरिनिर्वाण दिवस साजरा करण्यात आला .


या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभा च्या महिला पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …