Breaking News

*स्थानिय गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण पथकाने केबल चोरी तपास लावत १० कि. तांब्याच्या तारासह आरोपी पकडले* *कारवाई दरम्यान पाच हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त*

*स्थानिय गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण पथकाने केबल चोरी तपास लावत १० कि. तांब्याच्या तारासह आरोपी पकडले*

*कारवाई दरम्यान पाच हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत समर सिब्बल वाटर पंप चा १०० फुट तांब्याच्या केबल तार चोरीची तक्रार दाखल असल्याने स्थानिय गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण पथकाने केबल चोरीचा तपास लावत १० किलो तांब्याचा तार किमत पाच हजार रूपये सह आरोपींना पकडुन पुढील कारवाई करिता कन्हान पोलीसाच्या स्वाधिन केले.
शुक्रवार दिनांक ३ डिसेंबर ला रात्री कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत मनमानी बिल्डर्स कंपनी चा सुरक्षा रक्षकाने फोन करून सांगितले की कुणीतरी अज्ञात इसमाने समर सिब्बल वाटर पंप चा १०० फुट तांब्याच्या केबल तार चोरी केल्याची फिर्यादी ची तक्रार दाखल असल्याने स्थानिय गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अनिल राऊत, हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर राऊत, अरविंद भगत, नापोशि शैलेश यादव, पोशि प्रणय दासी, साहेबराव बहाडे यांनी केबल चोरीचा शिताफितीने तपास लावत १० किलो तांब्याचा तार किमत पाच हजार रूपये सह आरोपी १) राकेश गणेश वय २५ वर्ष राहणार प्रभाग क्र ७ पिपरी कन्हान २) सतीश दुधनाथ तिवारी यांना पकडुन कन्हान पोलीस स्टेशन ला अपराध क्रमांक ३७६/२०२१ कलम ३७९, ४११ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करिता कन्हान पोलीसाच्या स्वाधिन करण्यात आले आहे. सदर घटनेचा पुढील तपास कन्हान पोलीस करत आहे .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …