Breaking News

*रामकृष्ण मठ नागपुर व्दारे पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाच्या गरजु विद्यार्थ्याना कंबल वाटप*

*रामकृष्ण मठ नागपुर व्दारे पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाच्या गरजु विद्यार्थ्याना कंबल वाटप*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – रामकृष्ण मठ धंतोली नागपुर च्या विद्यमाने पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय कन्हान येथे विद्यालयातील गरीब गरजु विद्यार्थांना कंबल वाटप करण्यात आले असुन या कार्यक्रमात ४० विद्यार्थ्यानी सेवेचा लाभ घेतला .


शनिवार दिनांक.४ डिसेंबर २०२१ ला पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय कन्हान येथे रामकृष्ण मठ धंतोली नागपुर च्या विद्यमाने विद्यालयातील गरीब गरजु विद्यार्थांना कंबल वाटप कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालया चे मुख्याध्यापक श्री आसटकर सर, प्रमुख अतिथी रामकृष्ण मठ चे गुणदानंन्द महाराज, श्री शेंडे सर, श्री गोसटकर सर रामकृष्ण मठ नागपुर यांच्या प्रमुख हस्ते कंबल वाटप करण्यात आले असुन विद्यालयातील एकुण ४० विद्यार्थ्याना सेवेच्या लाभ घेतला. कार्यक्रमास विद्यार्थ्यासह पालक सुद्धा उपस्थिती होते. याप्रसंगी स्वामी गुणदानंद महाराज यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकीत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामकृष्ण मठ नागपुर चे श्री शेंडे सर यांनी केले. आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री आसटकर सर यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री साबळे सर यांनी तर आभार श्री खंडाईत सर यांनी व्यकत करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …