Breaking News

*टेकाडी येथे एका युवकाने गळफास घेऊन केली आत्महत्या* *फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन येथे मर्ग चा गुन्हा दाखल*

*टेकाडी येथे एका युवकाने गळफास घेऊन केली आत्महत्या*

*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन येथे मर्ग चा गुन्हा दाखल*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत टेकाडी गावातील एका युवकाने शुल्लक कारणावरून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरुन मर्ग चा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे .
पोलीस सुत्राकडुन प्राप्त झालेल्या माहितीनुसार अक्षय सोनवणे याच्या भासाच्या सोमवारी वाढदिवस असल्याने त्याने सायंकाळी घरी येऊन आईला भासाच्या वाढदिवस साजरा करण्यासाठी बहिणीकडे जाण्याचा तगादा लावला होता. आईने म्हटले की जावाई कडे लग्नाचा कार्यक्रम असल्याने आत्ताच जाण्यापेक्षा लग्नाला जाऊन दोन चार दिवस राहु. म्हणून भासा च्या वाढदिवसा ला जाण्यास नकार दिला. त्यानंतर काही वेळातच अक्षय सोनवणे नी राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.


कन्हान पोलीसांना घटनेची माहिती मिळताच कन्हान पोलीस स्टेशन चे सहायक पोलीस निरिक्षक अमितकुमार आत्राम कर्मचाऱ्यां सह घटनास्थळ गाठुन पंचनामा करून मृतदेह शासकीय ग्रामिण उप जिल्हा रुग्णालय कामठीला शवविच्छेदना करिता पाठविण्यात आला. कन्हान पोलीसांनी फिर्यादी पंफुला धनराज सोनवने वय ४८ वर्ष राहणार हरीहर नगर कांद्री यांच्या तक्रारी वरुन पोस्टे ला कलम १७४ जाफौ कायदान्वये मर्ग चा गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार खुशाल रामटेके हे करित आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …