Breaking News

*कन्हान येथे श्री संत जगनाडे महाराज यांची ३९७ वी जयंती थाटात साजरी* *विविध सामाजिक संघटने द्वारे ठिकठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन*

*कन्हान येथे श्री संत जगनाडे महाराज यांची ३९७ वी जयंती थाटात साजरी*

*विविध सामाजिक संघटने द्वारे ठिकठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या ३९७ वी जयंती निमित्य कन्हान येथे विविध सामाजिक संघटने द्वारे ठिकठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करुन श्री संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार व पुष्प अर्पण करित विनम्र अभिवादन करून श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली .

कन्हान-पिपरी नगरपरिषद

कन्हान – पिपरी नगरपरिषद कार्यालयात श्री संत जगनाडे महाराज यांच्या ३९७ व्या जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करून कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित नप नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर यांच्या हस्ते श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमात उपस्थित सर्व नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करी श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली. या प्रसंगी कन्हान – पिपरी नगरपरिषद च्या नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर , नगरसेवक राजेश यादव, हर्षल जगताप, फिरोज बिसेन, संकेत तालेवार, मोहनसिंग यादव, शुभम काळ बांडे, शुभम येलमुले, रविंन्द्र पाहुणे, नेहाल बढेल, देवीलाल ठाकुर, अरविंद देशमुख सह आदि नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.


तेली समाज कन्हान कांद्री

तेली समाज कन्हान-कांद्री द्वारे श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या ३९७ व्या जयंती निमित्य श्री संताजी सभागृह कन्हान-कांद्री येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित अशोक हिंगणकर यांच्या हस्ते श्री संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली असता कार्यक्रमात उपस्थित सर्व नागरिकांनी श्री संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करून विनम्र अभिवादन करीत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली. या प्रसंगी शरद डोणेकर, अशोक हिंगणकर, वामन देशमुख, पतिराम देशमुख, मनोहराव कोल्हे, कृष्णराव सराटकर, लक्ष्मीकांत गिरडकर, सोनु कापसे , सुरेश आंबागडे सह समाज बांधव नागरिक उपस्थित होते.

भाजपा ओबीसी मोर्चा कन्हान शहर

भाजपा ओबीसी मोर्चा कन्हान शहर द्वारे श्री संत जगनाडे महाराजांच्या ३९७ व्या जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन श्री संताजी सभागृह कांद्री-कन्हान येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित भाजपा ओबीसी मोर्चा नागपुर जिल्हा महामंत्री रामभाऊ दिवटे, व मनोज पोटभरे यांच्या हस्ते श्री संत संताजी जगनाडे महाराजां च्या प्रतिमेला पुष्पहार माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यावेळी रामभाऊ दिवटे यांनी श्री संत संताजी जगनाडे महाराजांच्या जीवनावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास उपस्थित सर्व भाजपा पदाधिकाऱ्यांनी श्री संत जगनाडे महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत श्री संत संत जगनाडे महाराजांची जयंती थाटात साजरी करण्यात आली. या प्रसंगी भाजपा ओबीसी मोर्चा नागपुर जिल्हा महामंत्री रामभाऊ दिवटे, भाजपा ओबीसी मोर्चा पारशिवनी तालुकाध्यक्ष नरेश पोटभरे, भाजपा ओबीसी मोर्चा कन्हान शहराध्यक्ष अमोल साकोरे, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा महा मंत्री रिंकेश चवरे, तालुका महामंत्री सचिन वासनिक, अनुसूचित जाती मोर्चा कन्हान शहराध्यक्ष संजय रंगारी, भाजपा कन्हान शहर महामंत्री सुनील लाडेकर , शहर महिला आघाड़ी महामंत्री सुषमा मस्के, प्रसिद्धि प्रमुख ऋृषभ बावनकर, विनोद किरपान, मयुर माटे, सह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …