Breaking News

*कांद्री येथे श्री संत जगनाडे महाराज यांची ३९७ वी जयंती थाटात साजरी* *तेली समाज पंच कमेटी व संताजी सत्कार समिती कांद्री यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन*

*कांद्री येथे श्री संत जगनाडे महाराज यांची ३९७ वी जयंती थाटात साजरी*

*तेली समाज पंच कमेटी व संताजी सत्कार समिती कांद्री यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – श्री हनुमान मंदिर देवस्थान कांद्री येथे तेली समाज पंच कमेटी व संताजी सत्कार समिती कांद्री यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत जगनाडे महाराज यांच्या ३९७ व्या जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मान्यवरांचा हस्ते श्री संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत श्री संत जगनाडे महाराज यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली .
बुधवार दिनांक ८ डिसेंबर ला श्री संत जगनाडे महाराज यांच्या ३९७ व्या जयंती निमित्य कांद्री हनुमान मंदिर देवस्थान येथे तेली समाज पंच कमेटी व संताजी सत्कार समिती कांद्री यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित कांद्री ग्रामपंचायत सरपंच बलवंत पडोळे यांच्या हस्ते श्री संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार माल्यार्पण करुन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली असता कार्यक्रमात उपस्थित सर्व नागरिकांनी श्री संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करून विनम्र अभिवादन केले. त्यानंतर भजन व आरती करून तसेच बुंदी चा प्रसाद वाटप करुन श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली .


या प्रसंगी कांद्री ग्रामपंचायत सरपंच बलवंत पडोळे, सदस्य शिवाजी चकोले, धनराज कारेमोरे, नरेश पोटभरे, सुत्तम मस्के, झिबल सरोदे, गणेश सरोदे, मधुकर कामडे, शेषराव आकरे, ‌श्रावण मस्के, इंन्द्रपाल वंजारी, संकेत चकोले, कुशल पोटभरे, अमरदीप कापसे, खुशाल पोटभरे, विष्णु सरोदे, प्रितम आकरे, सुभाष कापसे, केतन सम रीत, राजहंस वंजारी, योंगेन्द्र आकरे, अशोक किरपान, प्रविण आकरे, दिलीप पाहुणे, महेंन्द्र बाबु पलिये,कवडु आकरे, प्रेमदास आकरे, रामा हिवरकर, सुरेश उमक सह नवदुर्गा महिला भजन मंडळाचे पदाधिकारी बहु संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता वामन देशमुख, धनराज ढोबळे, रोहित चकोले, श्याम मस्के, प्रशांत देशमुख, लोकेश वैद्य सह समाज बांध वानी सहकार्य केले.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …