Breaking News

*कन्हान व गर्डापार ला जागतिक मानव अधिकार दिवस साजरा* *मानव अधिकार संरक्षण संघटना व पलिता बहुउद्देशीय संस्था द्वारे कार्यक्रमाचे आयोजन*

*कन्हान व गर्डापार ला जागतिक मानव अधिकार दिवस साजरा*

*मानव अधिकार संरक्षण संघटना व पलिता बहुउद्देशीय संस्था द्वारे कार्यक्रमाचे आयोजन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान येथे मानव अधिकार संरक्षण संघटना व गर्डापार येथे पलिता बहुउद्देशीय संस्था द्वारे जागतिक मानव अधिकार दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित पदाधिकार्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत जागतिक मानव अधिकार दिवस साजरा करण्यात आला .

*कन्हान येथे मानव अधिकार संरक्षण संघटना व्दारे मानवाधिकार दिवस साजरा*

कन्हान :- कन्हान गहुहिवरा चौक येथे मानव अधिकार संरक्षण संघटना कन्हान द्वारे जागतिक मानवाधिकार दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित नागरिकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरूवात केली असता कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित संघटने चे अध्यक्ष पंकज रामटेके यांनी संविधान ची प्रस्ताविका वाचुन मानवाचे मूलभूत अधिकार या विषयावर मत व्यक्त केले ,
या प्रसंगी प्रामुख्याने मानव आधिकार संरक्षण संघटना कन्हान शाखा चे अध्यक्ष पंकज रामटेके , जगन्नाथ पाल , प्रमोद चंद्रिकापुरे , मनीष नदेश्वर , सतीश परिहार , हेमंत बांगरे , सोनू पात्रे , मायाताई चिमणकर , नूर जहा शेख , पुनम पवार , संगीता पाटील , सह संघटने चे पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते .

*पलिता बहुउद्देशीय संस्था नागपूर*

नागपुर – पलिता बहुउद्देशीय संस्था नागपूर द्वारे शुक्रवार दिनांक १० /१२/२०२१ ला गाव गर्डापार तहसील भिवापूर जिल्हा नागपूर येथे जागतिक मानव अधिकार दिवस साजरा करण्यात आला .कार्यक्रमाचे आयोजक श्री विनोद भाऊ पवार NRC ईकोनेट समन्वयक व पॅरालिगल कार्यकर्ता सौ ललिता ताई कुळमते , सौ सरोजताई बोरकर असुन कार्यक्रमाची सुरुवात डॉ बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार माल्यार्पण करुण करण्यात आली . कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शन श्री विजय भाऊ कारेमोरे यांनी केले असुन समाजाला संविधानिक मानव अधिकार काय आहे समजवून सांगितले . तसेच श्री राठोड सर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व संविधानात काय अधिकार आहे त्याबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले .
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित श्री विजय भाऊ कारेमोरे (सरपंच ग्रामपंचायत पाहमी ) सौ सुनंदा बाई पवार (उपसरपंच ग्रामपंचायत पाहमी) श्री धनराजजी पवार (अध्यक्ष शिक्षण व्यवस्थापन समिती) श्री राठोड सर शिक्षक (जिल्हा परिषद शाळा गर्डापार ) श्री समिर भाऊ पडोळे (पत्रकार) सौ कविता ताई म्हैसकर अंगणवाडी सेविका व गावातील पारधी समाज नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सुत्र संचालन सौ ललिता ताई कुळमते यांनी केले तर आभार श्री विनोद पवार यांनी मानले .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …