Breaking News

*मृदेचे आरोग्य चांगले तर आपले आरोग्य चांगले- प्रा डॉ. अनिल भिकाने*

*मृदेचे आरोग्य चांगले तर आपले आरोग्य चांगले- प्रा डॉ. अनिल भिकाने*


पाटणसावंगी – शेतीत रासायनिक खते व किटकनाशकांच्या बेसुमार वापराबरोबर सेंद्रिय खतांचा अभाव यामुळे जमिनिची सुपीकता कमी होत असून त्याचा अन्न धान्याच्या उत्पादनाबरोबर गुणवत्तेवरही विपरित परिणाम होत आहे. पर्यायाने त्याचा मनुष्य व प्राण्यांच्या आरोग्यावर दुष्परीणाम होत आहे म्हणून ‘मृदेचे आरोग्य चांगल तर आपल आरोग्य चांगल ‘ असा संदेश प्रा डॉ अनिल भिकाने, संचालक विस्तार शिक्षण यानी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, दूधबर्डी, नागपूर आणि कृषी विभाग, सावनेर यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे पाटणसावंगी, ता. सावनेर, जि. नागपूर येथे दि ५ डिसेंबर २०२१ रोजी जागतिक मृदा दिनाचे औचित्य साधून आयोजीत कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना दिला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ रोशनी ठाकरे होत्या तर व्यासपीठावर श्री. नंदकिशोर राऊत,उपसभापती,खरेदी विक्री संघ, सावनेर व श्री. दीपक दलाल, उपसरपंच, पाटणसावंगी उपस्थीत होते. सदर कार्यक्रमात सौ.शुभांगी राठोड, तालुका कृषी अधिकारी, सावनेर यांनी मृदा दिवसाचे महत्व सर्व शेतकऱ्यांना पटवून दिले तसेच श्री. रोशन डंभारे, पर्यवेक्षक कृषी विभाग पाटणसावंगी यांनी मृदा परीक्षण कसे करावे, माती परीक्षणाचे नमुने कसे घ्यावे आणि जीवामृत बनवण्याची पद्धत याबद्दलचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना केले. सदर कार्यक्रमात डॉ. सारीपुत लांडगे, वरिष्ठ वैज्ञानिक तथा प्रकल्प समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, दूधबर्डी, नागपूर यांनी माती परीक्षणासाठी मातीचे नमुने घेताना घ्यावयाची काळजी याबद्दलचे मार्गदर्शन केले.
नंदापुर गावचे प्रगतशील शेतकरी श्री. तुळशीदास पाटील यांचा सेंद्रिय शेतीमध्ये उत्कृष्ट कार्य करून इतर शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीसाठी प्रेरित केल्याबाबत डॉ भिकाने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.मयुरी ठोंबरे, विषय विशेषज्ञ (गृह विज्ञान) यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.अश्विनी गायधनी, विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या) यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ.अमोल हरणे, विषय विशेषज्ञ (पिक संरक्षण) आणि श्री तुषार मेश्राम, विषय विशेषज्ञ (विस्तार शिक्षण) यांनी परिश्रम घेतले.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …