Breaking News

*विद्यार्थ्यांनी स्वत:शी स्पर्धा करुन यश प्राप्त करावे-प्रा.संदीप धोटे*

*विद्यार्थ्यांनी स्वत:शी स्पर्धा करुन यश प्राप्त करावे-प्रा.संदीप धोटे*

 

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी – दिलीप येवले

कोराडी:- आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे ,शासकीय नोक-यामध्ये जागा कमी असतात बेकारी जास्त असल्यामुळे नोकरी मागणा-यांची संख्या जास्त असते. त्यामुळे स्पर्धा वाढते अशा वेळेस विद्यार्थ्यांनी आपसात स्पर्धा न करता स्वत:शी स्पर्धा करुन यश प्राप्त करावे ,असे स्पष्ट मत प्रा.संदिप धोटे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडले.आणि विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तराच्या स्वरुपात चर्चा केली.
तायवाडे महाविद्यालय, महादुला-कोराडी येथील प्रशिक्षण सेवा समिती व युनिक अॕकॕडमी नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी *पदवी काळात UPSC / MPSC स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी ?* या विषयावर मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले .या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.शरयू तायवाडे, महाविद्यालयातील प्रशिक्षण सेवा समीतीचे समन्वयक डॉ.वकील शेख तर प्रमुखवक्ते व मार्गदर्शक म्हणुन युनिक अॕकॕडमी नागपूरचे प्रा.संदीप धोटे व प्रा.सचिन भुरे उपस्थित होते .या दोघांनीही विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये चांगल्या प्रकारे यश प्राप्त करण्यासाठी कशा प्रकारे अभ्यास करावा,यासंबंधी अतिशय चागंल्या प्रकारे मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेत स्पर्धा परीक्षा समीतीचे सदस्य डॉ.किशोर घोरमाडे,डॉ.शरद डवरे ,डॉ.अजय रामटेके ,डॉ.योगेश थेरे व महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …