*मोठी बातमी*
*वाघोली शिवारात दोन ट्रकचा भीषण अपघात, एक ट्रक पलटला*
*ट्रक चालक जख्मी, ट्रक व मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत सात किलो मीटर अंतरावर नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गावरील वाघोली बस स्टाॅप जवळ दोन ट्रकचा भीषण अपघात होऊन ट्रक चालक जख्मी होऊन उपचार सुरू असुन ट्रक व त्यातील मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने कन्हान पोलीस स्टेशन ला आरोपी ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

पोलीस सुत्राकडुन प्राप्त झालेल्या माहितीनुसार शुक्रवार दिनांक.१० डिसेंबर २०२१ ला रात्री १२ ते २:३० वाजता दरम्यान अरविंद राजबहादुरसिंग शेखरवार आपल्या ताब्यातील ट्रक क्रमांक. आर जे ११ जीबी ४३२१ ने जबलपुर वरून नागपुर कडे धानाचे बोरे घेऊन येत असतांना नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गावरील वाघोली बस स्टाॅप जवळ नागपुर वरून जबलपुर कडे चना दाळ चा माल घेऊन जाणारा ट्रक क्रमांक. एम पी ५१ बीबी ०४०१ च्या चालकाने आपल्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगाने व निष्काळजी पणाने चालवुन रस्ता दुभाजक ओलाडुन समोर जबलपुर कडुन येणाऱ्या ट्रक क्रमांक आर जे ११ जीबी ४३२१ ला जोरदार धडक मारल्या ने ट्रक क्रमांक आर जे ११ जीबी ४३२१ हा ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात ट्रकचे व ट्रक मधील धान माला चे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन ट्रक चालक गंभीर जख्मी झाल्याची माहिती कन्हान पोलीसांना मिळताच पोलीसांनी घटनास्थळी पोहचुन जख्मी चालकाला उप चाराकरिता नागपुर रुग्णालयात पाठवुन घटस्थळाचा पंचनामा करून कन्हान पोलीसांनी फिर्यादी अरविंद राजबहादुरसिंग शेखरवार यांच्या तक्रारीवरून आरोपी ट्रक चालका विरुद्ध कलम २७९, ३३७, ४२७, १८४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे.

Maharashtra News Media सच की आवाज