Breaking News

*बखारी शिवारात बिबटयाने हल्ल्या करून वासरा ला मारले ठार*

*बखारी शिवारात बिबटयाने हल्ल्या करून वासरा ला मारले ठार*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – पारशिवनी तालुकातील ग्राम पंचायत बखारी शिवार शेतात एका बिबटया ने केलेल्या हल्ल्यात शेतातील गोटयातील पहाटे गाईचा गोऱ्याची शिकार करून ठार मारलेल्याने शेतकऱ्यांच्या पाळीव प्राणी ठार होऊन भयंकर नुकसान झाल्याने गावात भितीचे वातावरण निर्माण होऊन वन विभागाने बखारी परिसरातील नर्सरी व वनविभागाची जागा कम्पाऊड करून सुरक्षित करून संबधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
पेच व्याघ्र प्रकल्प च्या पटगोवारी वन परिक्षेत्र अंतर्गत पेंच नदी काठावरील ग्राम पंचायत बखारी शिवारात असलेल्या वनविभागाची नर्सरी व जागेला साधे ताराचे सुध्दा कम्पाऊड करण्यात आले नसल्याने पेंच व्याघ्र प्रकल्पातील जंगली जनावरे पेंच नदी किनाऱ्याच्या सहाय्याने येत असून रात्र बेरात्री या जनावरांच्या हल्यात प्राळीव प्राणी व वेळे प्रसंगी नागरिकांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे. अश्यातच सोमवार दिनांक.६ डिसेंबर २०२१ ला पहाटे ४ वाजता दरम्यान बखारी गावाच्या शेतशिवारात पिडीत शेतकरी लिलाधर वासुदेव ठाकरे यांच्या शेतातील गोठयात दोन गाई व एक गोरा ( वासरू) हे रविवारी दिनांक.५ ला रात्री बांधुन आपल्या घरी आले. सोमवारी पहाटे चार वाजता च्या सुमारास बिबटयाने एका गोऱ्याची शिकार केली. गोरा बिबट्याच्या तावडीतुन सुटला मात्र जख्मी करून गोऱ्या ला काही अंतरावर नेऊन शिकार केल्याने त्याचा मृत्यु झाला. घटनेची माहीती शेतकरी लिलाधर ठाकरे यांनी गावचे सरपंच नरेश ढोणे यांच्या मार्फत वनविभाग पटगोवारी चे वनरक्षक टेकाम यांना दिली. वनरक्षक श्री टेकाम यांनी आपले वरिष्ठ अधिकारी वन क्षेत्र सहायक श्री ए. सी. दिग्रेसे साहेबाना दिल्याने वनक्षेत्र अधिकारी श्री दिग्रेसे व वनरक्षक श्री टेकाम हे घटनास्थळी पोहचुन निरिक्षण करून पंच अशोक ठाकरे आणि ज्ञानेश्वर खंडाते याचे सामोर पंचनामा करून पंचायत समिती पारशिवनी चे वरिष्ठ बफकिय अधिकारी यांनी शवाविच्छेदन करून अहवाल वनविभागाचे अधिकारी याना दिला.
बिबटयाच्या हल्यात शेतकऱ्याचा गोरा मुत्यु होऊन १५ हजार रूपयाचे नुकसान झाल्याने बखारी गावचे सरपंच नरेश ढोणे , पिडीत शेतकरी लिलाधर ठाकरे व गावकरी नागरिकांनी वनविभागाचे अधिकाऱ्याशी चर्चा करून पिडीत शेतकऱ्यास त्वरित नुकसान भरपाई द्यावी तसेच वन विभागाची नर्सरी व खुली जागा कंपाऊड करून सुरक्षित करावी. जेणे करून जंगली जनावरे गावाकडे येतील नाही. आणि जंगली जनावरांच्या हल्यात जिवहानी होणार नाही. अशी मागणी लावुन धरली.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …