रविकांत रागीट प्रशासकीय महाविद्यालयात जागतिक बाल दिन साजरा

विशेष प्रतिनिधी: प्रेमानंद हटवार
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्म दिवस जागतिक बाल दिन म्हणून साजरा करण्यात येतो रविकांत रागीट प्रशासकीय महाविद्यालय व दमयंती ताई देशमुख बीएड आणि डीएड महाविद्यालयात “जागतिक बालक दिन” कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य रविकांत रागीट आणि दमयंतीताई देशमुख डीएड बीएड महाविद्यालयाच्या प्राचार्या जयश्रीताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉली मॅडम यांनी सांभाळले. तर कार्यक्रमाचे आयोजन प्रा. प्रेमानंद हटवार यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बीए. प्रशासकीय विभाग प्रमुख प्रा. दिलीप गिरडे तर कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून डीएड बीएड विभागप्रमुख प्रा. उर्मिला नाईक यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या राजकीय-सामाजिक, जीवन कार्यावर प्रकाश टाकला आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तर डीएड प्रथम वर्षाची विद्यार्थिनी तेजस्विनी देंवढगले हिने कार्यक्रमाचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्रा. प्रशांत सरपाते प्रा. अनिल मिरासे प्रा. नेवारे, वानखेडे मॅडम,शेंद्रे मॅडम, उके मॅडम,ठाकरे मॅडम आणि महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी आणि इतर शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सहकार्य लाभले .
Maharashtra News Media सच की आवाज