Breaking News

*भाजपा द्वारे जनरल बिपीन रावत यांना दिली श्रद्धांजली*

*भाजपा द्वारे जनरल बिपीन रावत यांना दिली श्रद्धांजली*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – भारतीय लष्कराचे दीर्घकाळ सेवा करणारे माजी लष्कर प्रमुख आणि चीफ आॅफ डिफेंन्स स्टाफ (सीडीएस) स्वर्ग श्री बिपीन रावत व त्यांच्या पत्नी सह १३ वरिष्ठ अधिकार्यांचे हेलिकॉप्टर खराब हवामाना मुळे तमिळनाडुतील कुन्नुर मध्ये कोसळले . यात बिपीन रावत हे गंभीर जख्मी झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते . मात्र उपचारा दरम्यान त्यांचा निधन झाला . बिपीन रावत यांच्या निधना नंतर संपुर्ण देशात शोक चे वातावरण निर्माण झाल्याने कन्हान येथे भाजपा कन्हान शहर च्या पदाधिकार्यांनी तारसा रोड शहिद चौक येथे श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित भाजपा कन्हान शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक यांच्या हस्ते स्वर्ग श्री बिपीन रावत यांच्या प्रतिमेला व शहिद स्मारकावर पुष्प हार माल्यार्पण करुन व दीप प्रज्वलन करुन श्रद्धांजली कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात उपस्थित सर्व भाजपा पदाधिकार्यांनी बिपीन रावत यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन तसेच दोन मिनटाचा मौन धारण करुन स्वर्ग श्री बिपीन रावत सह घटनेत शहिद झालेल्या १३ वरिष्ठ अधिकार्यांना भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित केली .
या प्रसंगी भाजपा नागपुर जिल्हा ग्रामीण ओबीसी मोर्चा महामंत्री रामभाऊ दिवटे , भाजपा नागपुर जिल्हा मंत्री जयराम मेहरकुळे , भाजपा नागपुर जिल्हा महिला आघाडी उपाध्यक्ष स्वाती पाठक , भाजपा कन्हान शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक , महामंत्री माधव वैद्य , शहर उपाध्यक्ष मनोज कुरडकर , शहर महिला आघाड़ी अध्यक्ष तुलेषा नानवटकर , महामंत्री सुषमा मस्के , युवा मोर्चा शहर अध्यक्ष विक्की सोलंकी , भाजपा अनुसूचित जाति मोर्चा कन्हान शहर महामंत्री अजय लोंढे , नगरसेवक राजेंद्र शेंदरे , नगरसेविका वर्षा लोंढे , वंदना कुरडकर , शहर प्रसिद्ध प्रमुख रुषभ बावनकर , अमन घोडेस्वार , सह आदि भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …