*सावनेर पोलीस स्टेशन अंतर्गत स्वातंत्र्याचा अमु्त महोत्सव साजरा*
*भालेराव हायस्कूल च्या शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांचा सहभाग*
सावनेरः पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत दि.11-12-2021 रोजी 11.00 ते 12.00 वाजता पर्यंत भालेराव हायस्कूल व जुनियर कॉलेज सावनेर येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत नागपुर जिल्हा ग्रामीणच्या पोलीस बँड वर देशभक्तीपर गीतांची धून वाजवुन स्वातंत्र्याचा लढ्यात देशाकरिता बलिदान देणार्या शहिदांना आदरांजलीचा कार्यक्रम घेण्यात आला.

*पोलीस निरीक्षक मारुती मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न सदर आयोजनातच पीएसआय आशिष ठाकूर तसेच एपीआय सतिश पाटील यांनी विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम बद्दल मार्गदर्शन करण्यात आले.त्यात वाहने योग्य रितीने व योग्य वेगाने चालवावे,ओव्हरटेक करण्याची घाई करु नये,वाहनावर क्षमतेपेक्षा जास्त लोकांना बसवू नये,वाहतूक करतांना वाहन चालविण्याचा परवाना व वाहनांची कागदपत्रे सोबत ठेवने असे वाहतूक नियमांचे पालन करणे,वाहने चालवत असतांना नशापान तसेच स्टंटबाजी न करने,सोबतच रस्ते अपघात निदर्शनास येताच त्याची सुचना नजिकच्या पोलिसांना देण्याची विनंती करूण जनजागृती करण्यात आली.*

*याप्रसंगी भालेराव हायस्कूल व ज्युनिअर काँलेजचे विद्यार्थी व शिक्षकवृंद प्रमुखांने उपस्थित होते तर नागपुर जिल्हा ग्रामीण च्या बँड पथकाने मधुर स्वरात देशभक्ती गीते प्रस्तुत करुण कार्यक्रमाला रंगत आणली सदर बँड पथकात नागपुर ग्रामीणच्या महिला पोलीसांचा मोठा सहभाग होता हे विशेष*

*आयोजनाच्या यशस्वीतेकरिता एपीआय सतीश पाटील,सह पो.नि.आशिष ठाकूर ,पो उप नि.सौ एम डी रामटेके, मुख्याध्यापिका,वाहतूक शाखा सावनेर चे वाहतूक प्रमुख दिनेश काकडे,हेकां.सुनील तलमले,पोलीस सिपाई आशिष कारेमोरे,अंकुश शास्त्री,धोंडीबा नागरगोजे,अंकुश मुळे,रंजना कांबळे आदिंनी परिश्रम घेतले तर सदर आयोजनाला भालेराव हायस्कूल व ज्युनिअर काँलेजचे 350 ते 400 विद्यार्थी सोशल डिस्टंन्सीग मधे उपस्थित होते*
Maharashtra News Media सच की आवाज