Breaking News

*पायदळी सायकल घेऊन जाणाऱ्या म्हाताऱ्याला दुचाकी वाहन चालकाने मागुन दिली धडक* *म्हातारा गंभीर जख्मी , मेयो रूग्णालय नागपुर येथे उपचार सुरू* *फिर्यांदी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला दुचाकी वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल*

*पायदळी सायकल घेऊन जाणाऱ्या म्हाताऱ्याला दुचाकी वाहन चालकाने मागुन दिली धडक*

*म्हातारा गंभीर जख्मी , मेयो रूग्णालय नागपुर येथे उपचार सुरू*

*फिर्यांदी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला दुचाकी वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत पुर्वेस तीन किलो मीटर अंतरावर असलेल्या नागपुर जबलपुर बायपास अंडर ब्रिज जवळ तारसा रोड वर भाजीपाला कन्हान बाजारात विकुन सायंकाळी खंडाळा घरी पायदळ सायकल घेऊन जाणाऱ्या म्हाताऱ्याला एका दुचाकी चालका ने मागुन धडक मारल्याने झालेल्या अपघातात म्हातारा गंभीर जख्मी झाल्याने त्यांना मेयो रुग्णालय नागपुर येथे दाखल करून उपचार सुरू केला असुन कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरुन चालका विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.


पोलीस सुत्रा कडुन प्राप्त झालेल्या माहिती नुसार शुक्रवार दिनांक.११ डिसेंबर २०२१ ला फिर्यादी निलेश शेषराव गोरखेडे यांचे आजोबा सायंकाळी ७:०० ते ७:३० वाजता दरम्यान बाजारात मेथीची भाजी विकुन हातात सायकल घेऊन पायदळ कन्हान वरून खंडाळा (निलज) गाव ला परत जात असतांना नागपुर बॉयपास राष्ट्रीय महामार्ग अंडर ब्रिज जवळ कन्हान तारसा रोडवर रस्ता खराब असुन मागुन येणाऱ्या हिरो होंडा दुचाकी क्रमांक एम एच ४० बी वाय ७६०९ च्या चालकाचे नियंत्रण सुटुन म्हाताऱ्याला मागुन धडक दिल्याने झालेल्या अपघातात म्हातारा जख्मी झाल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे प्राथमिक उपचार करून गंभीर जख्मी असल्याने मेयो रूग्णालय नागपुर येथे उपचारार्थ दाखल करून फिर्यादी निलेश गौरखेडे यांचे तक्रारीवरून कन्हान पोलीसांनी दुचाकी चालक आरोपी प्रमोद वानखेडे राहणार. शिवनगर कन्हान यांचे विरुद्ध कलम २७९,३३७,३३८ भादंवि सहकलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला असुन कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस पुढील तपास करित आहे.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …