Breaking News

*नागपुर विधान परिषद वर भाजप चा झेंडा*

*नागपुर विधान परिषद वर भाजप चा झेंडा*

नागपुरः भाजप व काँग्रेस पक्षाच्या प्रतिष्ठेची तसेच अटितटची निवडणूक होण्याचे भाकीत असणाऱ्या सदर विधानपरिषद निवडणूकीत भारतीय जनता पक्षाचे पक्षाचे उमेदवार माजी उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांचे सर्व दावे फोल ठरवत मोठा विजय प्राप्त केला आहे.

*विधान परिषद निवडणुकीतील उमेदवार निहाय झालेले मतदान, चंद्रशेखर बावनकुळे ३६२, डॉ. रवींद्र भोयर ०१, मंगेश सुधाकर देशमुख १८६ एकूण वैध मते ५४९ अवैध मते ०५ . एकूण मतदान ५५४ ,निवडणुकीसाठी ठरलेला कोटा : २७५ चंद्रशेखर बावनकुळे यांनी पहिल्याच फेरीत कोटा पूर्ण केल्यामुळे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी विमला आर. यांनी भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांना महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयी घोषित करण्यात आले*


*निश्चितच विजय होणार असे भाकीत असुनही जोपर्यंत मतमोजणीतून विजय घोषित होत नाही तोवर कुणीही विजयी व पराजित मानले जात नाही व या निवडणुकीत ही असेच घडले व आखेर चंद्रशेखर बावनकुळे यांनी विजय संपादित करुण काँग्रेस पक्षाने वेळोवेळी चालविलेल्या कुरघोडीचा धुव्वा उडविला.*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …